गोवा पोलिसांकडून 1 लाख 80 हजार रुपयांचा चरस जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 12:33 IST2019-10-28T12:32:15+5:302019-10-28T12:33:58+5:30
दक्षिण गोव्यातील पोलिसांनी रविवारी कारवाई करत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गोवा पोलिसांकडून 1 लाख 80 हजार रुपयांचा चरस जप्त
मडगाव: हिमाचल प्रदेशातील एका युवकाकडून 1 लाख 80 हजार रुपये किमतींचा चरस गोवापोलिसांनी जप्त केला आहे. दक्षिण गोव्यातील पोलिसांनी रविवारी कारवाई करत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रेमकुमार सिंग असे संशयिताचे नाव आहे. पाटणे येथे पोलिसांनी या संशयिताला पकडून त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ३४७.१0 ग्राम चरस सापडल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली.अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदा १९८५ कलम २0 (ब) अंतर्गंत प्रेमकुमार याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. काणकोण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रिफा बार्रेटो पुढील तपास करीत आहेत.
पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार खबऱ्यांकडून पोलिसांना संशयित अमली पदार्थ घेउन येणार असल्याची पक्की माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचला व नंतर सिंग याला ताब्यात घेउन झडती घेतली असता त्याच्याकडे चरस सापडला.