जि.प. पोटनिवडणुकीत भाजपात बंडखोरी
By Admin | Updated: January 20, 2015 00:05 IST2015-01-20T00:05:36+5:302015-01-20T00:05:36+5:30
तालुक्यातील मुरमाडी-मौशीखांब जि.प. पोटनिवडणुकीसाठी भाजपाने जिल्हा सरचिटणीस प्रशांत वाघरे या बाहेरच्या उमेदवाराला अधिकृत उमेदवार केल्याने या निवडणुकीत भारतीय

जि.प. पोटनिवडणुकीत भाजपात बंडखोरी
गडचिरोली : तालुक्यातील मुरमाडी-मौशीखांब जि.प. पोटनिवडणुकीसाठी भाजपाने जिल्हा सरचिटणीस प्रशांत वाघरे या बाहेरच्या उमेदवाराला अधिकृत उमेदवार केल्याने या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात बंडखोरी झाली आहे. जिल्हा सचिव असलेले योगाजी बनपूरकर यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने या मतदार संघात पुन्हा काँग्रेसला संधी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
१३ जानेवारी या नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ६ जणांनी १३ अर्ज भरले होते. त्यात भाजपचे प्रशांत वाघरे व योगाजी बनपूरकर, कॉग्रेसचे गोकुलदास ठाकरे व माणिक झंझाड, बसपाचे प्रशिक म्हशाखेत्री व अपक्ष विनोद दशमुखे यांचा समावेश होता. भाजपाने प्रशांत वाघरे यांना उमेदवारी दिली आहे. सोमवारी नामांकन अर्ज परत घेण्याच्या दिवशी काँग्रेसचे पर्यायी उमेदवार माणिक झंझाड व अपक्ष उमेदवार विनोद दशमुखे यांनी आपले अर्ज मागे घेतले. परंतु योगाजी बनपूरकर यांनी आपला अर्ज कायम ठेवला. त्यामुळे भाजपात बंडखोरी झाली आहे. आता मुख्य लढत भाजपाचे प्रशांत वाघरे, कॉग्रेसचे गोकुलदास ठाकरे, बसपाचे प्रशिक म्हशाखेत्री व अपक्ष योगाजी बनपूरकर यांच्यात होणार आहे. त्यामुळे काँग्रेसला आता येथे मोठी संधी निर्माण झाली आहे. गेल्यावेळी येथून काँग्रेसचे बंडोपंत शंकरराव मल्लेलवार मोठ्या फरकाने प्रशांत वाघरे यांचा पराभव करीत विजयी झाले होते.