छत्तीसगडच्या युवकाचा गडचिराेलीत आत्महत्येचा प्रयत्न, स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने वार
By दिगांबर जवादे | Updated: July 9, 2023 20:39 IST2023-07-09T20:39:26+5:302023-07-09T20:39:34+5:30
गळा चिरल्याचे माहीत हाेताच नागरिकांनी याची माहिती पाेलिस स्टेशनला दिली.

छत्तीसगडच्या युवकाचा गडचिराेलीत आत्महत्येचा प्रयत्न, स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने वार
गडचिराेली :छत्तीसगड राज्यातील युवकाने गडचिराेली शहरात येऊन स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यात ताे किरकाेळ जखमी झाला आहे.
प्रतुल खाेकन बिश्वास (३३) रा. चित्तरंजनपूर ता. पाखांदूर जिल्हा कांकेर (छत्तीसगड) असे जखमी युवकाचे नाव आहे. प्रतुल हा रायपूरला जाताे असे कुटुंबीयांना सांगून घरून निघाला. मात्र ताे गडचिराेलीत आला. गडचिराेलीत त्याच्या काेणीही ओळखीचे नाही. शनिवारी सायंकाळच्या सुमारास त्याने गडचिराेली येथील संविधान चाैकात स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
यात ताे किरकाेळ जखमी झाला. त्याने गळा चिरल्याचे माहीत हाेताच नागरिकांनी याची माहिती पाेलिस स्टेशनला दिली. पाेलिसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात भरती केले. आता त्याची प्रकृती धाेक्याच्या बाहेर आहे. त्याच्या गळ्याला टाके मारण्यात आले आहेत. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न नेमका का केला हे कळू शकले नाही.