रक्त टंचाईच्या मुद्यावर तरूणाई सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:37 IST2021-03-18T04:37:22+5:302021-03-18T04:37:22+5:30
गडचिराेली : उन्हाळा सुरू झाल्याने गडचिराेली जिल्ह्यात एकमेव असलेल्या शासकीय रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातल्या त्यात काेराेना ...

रक्त टंचाईच्या मुद्यावर तरूणाई सरसावली
गडचिराेली : उन्हाळा सुरू झाल्याने गडचिराेली जिल्ह्यात एकमेव असलेल्या शासकीय रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातल्या त्यात काेराेना महामारीच्या काळात गरजू व गरीब रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध हाेत नसल्याने नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा युवक काॅंग्रेस व टायगर ग्रुप गडचिराेलीतर्फे १७ मार्च राेजी बुधवारला येथील कात्रटवार काॅम्प्लेक्समध्ये तातडीने रक्तदान शिबिर आयाेजित करण्यात आले. या शिबिरात २५ पेक्षा अधिक युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
शिबिराप्रसंगी प्रामुख्याने युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, टायगर ग्रुपचे जिल्हा प्रमुख दीपक भारसाकडे, सुरज काेडापे, डाॅ.अनंत कुंभारे, डाॅ.यशवंत दुर्गे, अंनिसचे जिल्हा प्रमुख विलास निंबाेरकर, डाॅ. किशाेर ताराम, सतीश तडकला आदी उपस्थित हाेते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी विकास चरडुके, स्वप्नील घाेसे, साहिल धाेडरे, सचिन पिपरे, युवनेश काेसलाकर, विशाल बंडावार आदींनी सहकार्य केले.