स्वप्नपूर्तीसाठी धावत असतांनाच युवकाचा मृत्यू; एसआरपीएफ भरतीच्या शारीरीक चाचणीदरम्यान अचानक पडला

By दिलीप दहेलकर | Updated: April 6, 2026 16:08 IST2026-04-06T16:02:51+5:302026-04-06T16:08:04+5:30

Gadchiroli : भारत राखीव बटालियन-४ अंतर्गत राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १७, चंद्रपूर येथील आस्थापनेवरील सशस्त्र पोलिस शिपाई संवर्गातील २४४ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.

Youth dies while running to fulfill his dream; He suddenly collapsed during the physical test for SRPF recruitment | स्वप्नपूर्तीसाठी धावत असतांनाच युवकाचा मृत्यू; एसआरपीएफ भरतीच्या शारीरीक चाचणीदरम्यान अचानक पडला

Youth dies while running to fulfill his dream; He suddenly collapsed during the physical test for SRPF recruitment

गडचिराेली : एसआरपीएफ भरतीच्या शारीरीक चाचणीदरम्यान धावत असताना अचानक पडल्याने एका युवकाचा मृत्यु झाल्याची घटना ६ एप्रिल राेजी साेमवारला सकाळी ८. ३० वाजताच्या सुमारास घडली. आशिष भास्कर म्हशाखेत्री (२१) रा. देलाेडा बुज.ता. आरमाेरी असे मृतक युवकाचे नाव आहे.

भारत राखीव बटालियन-४ अंतर्गत राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १७, चंद्रपूर येथील आस्थापनेवरील सशस्त्र पोलिस शिपाई संवर्गातील २४४ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १३, विसोरा, ता. (देसाईगंज) येथील कवायत मैदानावर ३१ मार्चपासून शारीरिक चाचणीला सुरुवात झाली आहे. 

विसाेरा येथील एसआरपीएफच्या कवायत मैदानावर ३१ मार्च पासून शारीरिक चाचणीला सुरुवात झाली असून १० एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. दररोज जवळपास १००० उमेदवारांची चाचणी घेतली जात आहे. भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची उपस्थिती पहाटे २ वाजतापासूनच दिसून येत असून रात्रीपासूनच हजारो युवक कवायत मैदानावर दाखल होत आहेत. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी होत आहे. संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडत असून प्रत्येक टप्प्यावर काटेकोर नियंत्रण ठेवले जात आहे.

उन्हाचा त्रास टाळण्यासाठी शारीरिक चाचणी पहाटे ४ ते सकाळी ९ या वेळेत घेतली जात आहे. दरम्यान देलाेडा येथील युवक आशिष म्हशाखेत्री शारीरीक चाचणीसाठी पहाटेला विसाेरा येथील कवायत मैदानावर हजर झाला. सीआरपीएफचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ताे धावला. धावत असताना शेवटच्या क्षणी धावपट्टीच्या सीमारेषेवर आशिष अचानक पडला. ताे शुध्दीवर हाेता, मात्र त्याला नेमके काय हाेतय, हे स्पष्ट उपस्थित डाॅक्टर व सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांना सांगता आले नाही. लागलीच आशिषला देसाईगंज येथील ग्रामिण रूग्णालयात भरती करण्यात आले. उपचार सुरू असतानाच १० ते १५ मिनिटांत आशिषची प्राणज्याेत मालवली. या घटनेची नाेंद देसाईगंज पाेलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

Web Title : पुलिस भर्ती के दौरान दौड़ते समय युवक की मौत

Web Summary : गढ़चिरौली में एसआरपीएफ भर्ती की शारीरिक परीक्षा के दौरान दौड़ते समय गिरने से आशीष म्हशाखेत्री नामक एक युवक की मौत हो गई। यह घटना विसोरा प्रशिक्षण मैदान में सशस्त्र पुलिस कांस्टेबल की भर्ती के दौरान हुई। उसे अस्पताल ले जाया गया लेकिन उसकी मृत्यु हो गई। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Youth Dies During Police Recruitment Physical Test; Collapses While Running

Web Summary : A youth, Ashish Mhashakhetri, died during an SRPF recruitment physical test in Gadchiroli after collapsing while running. The incident occurred at Visora training ground during ongoing recruitment for armed police constables. He was rushed to a hospital but died. Police are investigating.