युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST2020-08-15T05:00:00+5:302020-08-15T05:00:46+5:30
अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. केंद्र सरकारच्या २० लाख कोटींच्या पॅकेजपैकी १० हजार कोटींचे पॅकेज लघु व मध्यम उद्योगासाठी जाहीर केले होते. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करून या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र या पॅकेजमधील एकही रुपयाचा निधी एकाही लघु व मध्यम उद्योगासाठी उपलब्ध झाला नाही. बेरोजगार व शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळाली नाही, असा आरोप करत निदर्शने करण्यात आली.

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचे पॅकेज देशाच्या जनतेला देण्याबाबत घोषणा केली होती. कोरोना संकटामुळे गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्र व देशातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मात्र अशा परिस्थितीतही पंतप्रधानांनी घोषित केलेल्या पॅकेजमधील एकही रुपयांचा निधी मिळाला नाही असे सांगत केंद्र सरकारला या पॅकेजची आठवण करून देण्यासाठी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी चामोर्शी मार्गावर असलेल्या खा.अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
कोरोनाच्या संकटकाळात युवकांवर बेरोजगारीमुळे उपासमारी व आत्महत्येची वेळ आली आहे. काही युवक व्यसन व गुन्हेगारीच्या मार्गावर आहेत. अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. केंद्र सरकारच्या २० लाख कोटींच्या पॅकेजपैकी १० हजार कोटींचे पॅकेज लघु व मध्यम उद्योगासाठी जाहीर केले होते. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करून या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र या पॅकेजमधील एकही रुपयाचा निधी एकाही लघु व मध्यम उद्योगासाठी उपलब्ध झाला नाही. बेरोजगार व शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळाली नाही, असा आरोप करत निदर्शने करण्यात आली.
पंतप्रधानांनी घोषणा केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजमधील निधी गडचिरोली जिल्ह्याला उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्यांचे निवेदन खा.अशोक नेते यांना देण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, जिल्हा महासचिव आशिष कन्नमवार, महासचिव कुणाल पेंदोरकर, नितेश राठोड, वसंत राऊत, दिवाकर मिसार, ढिवरू मेश्राम, गौरव अलाम, निखील खोब्रागडे, गौरव येनप्रेड्डीवार, घनश्याम मुर्वतकर, वैभव कडस्कर व कार्यकर्ते उपस्थित होते.