अहेरीच्या महाेत्सवात थिरकल्या युवती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:36 IST2021-03-16T04:36:21+5:302021-03-16T04:36:21+5:30
याप्रसंगी प्राचार्य मनोरंजन मंडल, प्रेरणा गारोदे यांनी मार्गदर्शन केले. तसेच युवती प्रमुख जयश्री खोंडे, लक्ष्मण शेडमाके, सुरेंद्र अलोने, सुजित ...

अहेरीच्या महाेत्सवात थिरकल्या युवती
याप्रसंगी प्राचार्य मनोरंजन मंडल, प्रेरणा गारोदे यांनी मार्गदर्शन केले. तसेच युवती प्रमुख जयश्री खोंडे, लक्ष्मण शेडमाके, सुरेंद्र अलोने, सुजित निंबेकर यांनी मनाेगत व्यक्त केले. समूह व एकल नृत्य स्पर्धेचे परीक्षण शीला चौधरी व गोपाल कोडापे यांनी तर रांगोळी स्पर्धेचे परीक्षण व मूल्यांकन मंगला निखाडे, मनीषा कारेंगुलवार, अंकिता खंडाळे यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक, सन्मानपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी भालचंद्र ठाकरे, कांचन देशपांडे, मंगला भरतकर, भाविका मेहता, सरोज गुंडावार, आकाश सिडाम, कुणाल मेश्राम, उदय सिडाम, संदीप पोलमपल्लीवार, सावंत कोसरे, दुलेश मैलारपवार, अभिषेक मादासवार, प्रज्ज्वल गादासवार यांनी सहकार्य केले.
बाॅक्स
स्पर्धेत हे ठरले विजेते
समूह नृत्यात प्रथम क्रमांक डाजलर डान्स ग्रुप तर द्वितीय क्रमांक डी. गर्ल्स ग्रुप, कुंजन आर्या ग्रुप यांनी तृतीय क्रमांक तर प्रोत्साहन बक्षीस पूर्वा दोंतुलवार व रचना बोमकंटीवार यांनी पटकाविला. एकल नृत्यात प्रथम क्रमांक तनुश्री वेलादी तर द्वितीय क्रमांक साहिल शेख तर तृतीय क्रमांक क्षितिजा पुद्दटवार, प्रोत्साहन बक्षीस स्नेहल कुत्तरमारे यांनी पटकाविले. ६ ते १४ वर्ष ‘ब’ गटात प्रथम खुशी येनगंटीवार, द्वितीय अवनी मुळावार तर तृतीय क्रमांक अवनी दोंतुलवार हिने तर प्रोत्साहन बक्षीस सर्वेक्षा चव्हाण यांनी पटकाविले. सकाळच्या सत्रात कला विषयातून रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम क्रमांक शिवानी मिचा, द्वितीय स्वार्थिका कलीकोटावार तर तृतीय क्रमांक श्रीनिवास कविराजवार यांनी पटकाविला.