अज्ञात इसमाकडून युवतीची धारदार शस्त्राने हत्या

By दिलीप दहेलकर | Updated: July 14, 2023 17:56 IST2023-07-14T17:54:55+5:302023-07-14T17:56:45+5:30

रंगयापल्लीतील घटना : रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

young woman killed by unknown with a sharp weapon in gadchiroli district | अज्ञात इसमाकडून युवतीची धारदार शस्त्राने हत्या

अज्ञात इसमाकडून युवतीची धारदार शस्त्राने हत्या

गडचिराेली : राहत्या घरी खाटेवर झोपून असलेल्या एका २० वर्षीय अविवाहित युवतीची अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना सिरोंचा तालुक्याच्या रंगयापल्ली या गावात १३ जुलै रोजी गुरुवारला मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने गावात व परिसरात खळबळ उडाली आहे. ओलीता रामया सोयाम रा. रंगयापल्ली असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे.

या घटनेची तक्रार मृतक युवतीच्या भावाने सिरोंचा पोलिस ठाण्यात दाखल केली. तक्रारीत बुचया रामया सोयाम यांनी म्हटले आहे की, आपण रात्री घरी झोपून होतो. सकाळी उठल्यावर अंथरून व पांघरूनचे कपडे ठेवण्यासाठी खोलीत गेलो असता, बहीण ओलीता रामया सोयाम ही खाटेवर बेशुद्धावस्थेत पडून असल्याचे दिसले. तिच्या खाटेखाली रक्त सांडले होते व घराचा मागचा दरवाजा उघडा दिसला. 

दरम्यान मी ओलिताला हलवून उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र ती तशीच पडून होती. त्यानंतर आरडाओरड करून आपण आईला उठविले. घटनेची माहिती आपण गावातील नातलगांना दिली. दरम्यान जवळ जावून पाहिले असता, ओलीताच्या हनुवटीच्या खाली गळ्यावर, मानेवर धारदार शस्त्राचे वार दिसून आले. असे मृत युवतीच्या भावाने नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर तक्रारीवरून सिरोंचा पोलिसांनी अज्ञात आरोपीवर भादंवीचे कलम ३०२, ४४९ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: young woman killed by unknown with a sharp weapon in gadchiroli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.