विहिरीत उडी घेऊन युवतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:34 IST2020-12-31T04:34:20+5:302020-12-31T04:34:20+5:30

किरण कवडू पारधी (२२) रा.मालदुगी असे मृत युवतीचे नाव आहे. किरण ही मंगळवारच्या रात्रीपासूनच घरून बेपत्ता होती. घरच्या मंडळीनी ...

Young woman commits suicide by jumping into a well | विहिरीत उडी घेऊन युवतीची आत्महत्या

विहिरीत उडी घेऊन युवतीची आत्महत्या

किरण कवडू पारधी (२२) रा.मालदुगी असे मृत युवतीचे नाव आहे. किरण ही मंगळवारच्या रात्रीपासूनच घरून बेपत्ता होती. घरच्या मंडळीनी तिचा शोध रात्री उशिरापर्यंत घेतला, मात्र ती सापडली नाही. बुधवारी सकाळी पुन्हा शोधमाेहीम राबविली असता तिचा मृत्यदेह गावशेजारी असलेल्या शेतातील विहिरीत आढळून आला. घटनेची माहिती कुरखेडा पाेलिसांना देण्यात आली. त्यानंतर ठाणेदार सुधाकर देडे, सहायक पोलीस निरीक्षक समीर केदार यानी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व प्रेत विहिरीच्या बाहेर काढून उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रूग्णालयात पाठविले. किरणच्या आत्महत्येचे नेकमे कारण कळू शकले नाही. मात्र ती मानसिक आजाराने ग्रस्त हाेती, असे नागरिकांमध्ये बाेलले जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल माने करीत आहेत.

Web Title: Young woman commits suicide by jumping into a well