मास्क बॅंकेतून मिळणार माेफत मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST2021-03-13T05:05:59+5:302021-03-13T05:05:59+5:30

गडचिरोली : जागतिक महिला दिनानिमित्त गडचिराेली येथे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार कैलाश शर्मा यांनी मास्क बॅंकेची स्थापना केली. याद्वारे गरजूंना ...

You can get the mask from Mask Bank | मास्क बॅंकेतून मिळणार माेफत मास्क

मास्क बॅंकेतून मिळणार माेफत मास्क

गडचिरोली : जागतिक महिला दिनानिमित्त गडचिराेली येथे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार कैलाश शर्मा यांनी मास्क बॅंकेची स्थापना केली. याद्वारे गरजूंना माेफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले जाणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अपर जिल्हाधिकारी सोनाप्पा यनगार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख, उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ तसेच कपडा मार्केट संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल बिजवे, युवा उद्योजक सुमंत भट्टड उपस्थित होते. कोरोना संक्रमण पुन्हा वाढत असल्यामुळे प्रशासनातर्फे मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. गरीब व गरजू नागरिकांना माेफत मास्क उपलब्ध व्हावेत, यासाठी कैलाश शर्मा यांनी मोफत मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्याचे ठरवले. त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दानशूर व्यक्तिंनी या उपक्रमात सहभाग नाेंदवून मास्क व सॅनिटायझर दान द्यावेत, असे आवाहन शर्मा यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनार खोब्रागडे यांनी केले तर कृष्णा वाघाडे यांनी आभार मानले.

Web Title: You can get the mask from Mask Bank