शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

योग करणाऱ्यांचे ‘अच्छे दिन’ येतात, रामदेवबाबा यांचा राहुल गांधींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 6:33 PM

राहुल गांधी जिमसोबतच योगाही करीत आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधीही योगा करायचे. सोनिया गांधीसुद्धा योगा करतात. गांधी परिवार योगा करायला लागला आहेत. योग करणाऱ्यांचे अच्छे दिन येतात, असा टोला योगगुरु रामदेबबाबा यांनी लगावला. 

चंद्रपूर : राहुल गांधी जिमसोबतच योगाही करीत आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधीही योगा करायचे. सोनिया गांधीसुद्धा योगा करतात. गांधी परिवार योगा करायला लागला आहेत. योग करणाऱ्यांचे अच्छे दिन येतात, असा टोला योगगुरु रामदेबबाबा यांनी लगावला. कारभारात पारदर्शकता आणून भ्रष्टाचारमुक्त देश घडवून लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकपालची गरज आहे. पंतप्रधान पद हे देशाचे महत्त्वाचे पद आहे. या पदाची विश्वासार्हता जोपासण्यासाठी हे पद लोकपालच्या कक्षेत आणू नये, असेही रामदेवबाबा यावेळी म्हणाले.चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे राज्याचे अर्थ, नियोजन, वने मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून २० ते २२ पर्यंत नि:शुल्क योग चिकित्सा व ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त योगगुरु रामदेवबाबा चंद्रपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  याप्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवारही उपस्थित होते.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधात आंदोलनाच्या तयारीत आहे. परंतु देशाचा कारभार पारदर्शक असेल, तर आंदोलन करण्यात अर्थ नाही. अण्णा हजारे यांचे वय आता वाढलेले आहेत. राजकीय मंडळी त्यांचा फायदा घेत आहे. जेव्हा ते यातून दूर होऊन भ्रष्टाचारविरोधी आंदोलन करतील. तेव्हा त्यांच्यासोबत राहीन, असेही रामदेवबाबा म्हणाले.भ्रष्टाचारावर उपाय म्हणून पाचशे व हजार रुपयाच्या नोटा बंद कराव्यात, अशी आपली भूमिका होती. आजही ती कायम आहे. नोटबंदीमुळे बराच काळा पैसा बाहेर आला. त्यांच्यावर कारवायादेखील झाल्याचे दिसून आले. सरकारने ५०० व हजाराची नोट बंद करून दोन हजाराची नोट चलनात आणली. मात्र हे योग्य नाही, असे त्यावेळी आपण सांगितले होते. ही नोट अधिक काळ चलनात दिसणार नाही. ती बंद होईल, अशी शक्यताही यावेळी रामदेवबाबा यांनी व्यक्त केली. देशातून बाहेर गेलेला काळा पैसा परत आणावा, या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू असून आपलाही पाठपुरावा सुरू असल्याचे ते म्हणाले. 

एक पैसा जमा करतो दुसरा मोदी तो पळवितोसैद्धांतिक आधारावर काळ्याधनावर कार्यवाही करण्याची जबाबदारी सरकारची आहे. यावर पंतप्रधान मोदी यांनी कार्यवाही केलेली आहे. मात्र एक मोदी पैसा बँकेत जमा करतो आहे. आणि दुसरा मोदी जमा केलेला पैसा पळवितो आहे. हा राष्ट्रद्रोह आहे. राष्ट्रद्रोह समजून कारवाई करण्याची तरतूद संसदेने करायला पाहिजे. बँकेत नोटबंदीनंतर झालेल्या पैशाचे नियोजन करण्याचीही गरजही रामदेवबाबा यांनी व्यक्त केली. बाहेर देशात गेलेले काळेधन परत यावे, यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचेही ते म्हणाले.

मुनगंटीवार हे जनतेच्या आरोग्य, शिक्षण, व्यसनमुक्तीसाठी झटणारे राजकारणीमागील २५ वर्षांपासून राजकारणात विजेता ठरलेले ना. सुधीर मुनगंटीवार जनतेच्या मनात राज करीत आहेत. राजकारणात राहुन जनतेसाठी आरोग्य, शिक्षण आणि व्यसनमुक्तीसाठी ते झटत आहेत. सर्वांना शूून्य टक्के बजेटमध्ये आरोग्य लाभावे, अशी त्यांची भावना आहे. म्हणून त्यांच्या पुढाकारातून मूल येथे तीन दिवसीय योगचिकित्सा व ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचेही रामदेवबाबा यावेळी म्हणाले.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाRahul Gandhiराहुल गांधी