२ एकरात १७0 क्विंटल हळदीचे उत्पन्न

By Admin | Updated: May 12, 2014 23:40 IST2014-05-12T23:40:37+5:302014-05-12T23:40:37+5:30

जिल्ह्यात धान पिकाबरोबरच अनेक महत्वपूर्ण पिकांचे उत्पादन घेतले जात आहे. जिल्ह्यात पूर्वी न पिकविणार्‍या पिकांचे उत्पादन सध्या घेण्याकडे शेतकरी वळले आहेत.

The yield of 170 quintals of turmeric is 2 acres | २ एकरात १७0 क्विंटल हळदीचे उत्पन्न

२ एकरात १७0 क्विंटल हळदीचे उत्पन्न

विलास चिलबुले - आरमोरी

जिल्ह्यात धान पिकाबरोबरच अनेक महत्वपूर्ण पिकांचे उत्पादन घेतले जात आहे. जिल्ह्यात पूर्वी न पिकविणार्‍या पिकांचे उत्पादन सध्या घेण्याकडे शेतकरी वळले आहेत. आरमोरी येथील शेतकरी डॉ. महेश कोपूलवार यांनी आपल्या २ एकर शेतीमध्ये १७0 क्विंटल हळदीचे उत्पादन या हंगामात घेतले आहे. त्यामुळे जिल्ह्यात हळद पिकाला वातावरण पोषक असल्याचे दिसून येत आहे.

आरमोरी येथील शेतकरी डॉ. महेश कोपूलवार मागील पाच वर्षापासून आपल्या शेतात हळद पिकाचे उत्पादन घेत आहेत. यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी दोन एकर शेतीवर हळद पिकाची लागवड केली होती. हळदपिकाच्या उत्पादनासाठी सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागतो. जूनच्या पहिल्या आठवड्यातच हळद पिकाची लागवड केली जाते. त्यानंतर हळद पिकाच्या वाढीसाठी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. हळद पीक जानेवारी महिन्यात उगवते. उगवल्यानंतर त्याची तोडणी करून त्यावर प्रक्रिया करावी लागते. यात सर्वात प्रथम हळदीला पाण्यात उकळावे लागते. नंतर उन्हात वाळवून शुध्द पिवळय़ा रंगाची हळद तयार केली जाते. हळदीचे उत्पादन घेण्यासाठी अन्य पिकाच्या तुलनेत कमी o्रम लागत असते. कमी o्रम व अधिक आर्थिक मोबदला प्राप्त करण्याचे पीक म्हणून हळद पिकाकडे पाहिले जाते. जिल्ह्यातील शेतकरी हळद लागवडीकडे वळावे यासाठी कृषी विभागाच्यावतीने पुढाकार घेतला जात आहे. यासाठी कृषी विभागाकडून हळदीच्या लागवडीसाठी शेतकर्‍यांना अनुदान देण्यात येते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात हळदीला खुप मागणी आहे. यासाठी बाजारपेठ शोधण्याची तसदीही शेतकर्‍यांना घ्यावी लागत नाही.

बहुगुणी हळद औषधोपचार व अन्य उद्योगांमध्ये अधिक प्रमाणात वापरली जाते. त्यामुळे हळदीला मोठय़ा प्रमाणात बाजारात मागणी असते. खराब होणार्‍या हळदीचा उपयोगही बियाणे म्हणून केला जात असल्याने हळद वाया जाण्याची शक्यता कमी असते. बेरोजगार युवक, महिला गट यांच्या माध्यमातून गृहउद्योग उभारून हळदीचे पावडर तयार करून पाकीटमध्ये विक्री केल्यास आर्थिक मोबदला चांगल्या प्रकारे मिळू शकतो.

Web Title: The yield of 170 quintals of turmeric is 2 acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.