अखेर वडसा रेल्वे स्टेशनवर थांबली यशवंतपूर-कोरबा वैनगंगा एक्स्प्रेस

By दिलीप दहेलकर | Published: February 16, 2024 06:54 PM2024-02-16T18:54:38+5:302024-02-16T18:54:57+5:30

थांबा मिळाला : वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा

Yesvantpur Korba Wainganga Express finally halted at Vadsa railway station | अखेर वडसा रेल्वे स्टेशनवर थांबली यशवंतपूर-कोरबा वैनगंगा एक्स्प्रेस

अखेर वडसा रेल्वे स्टेशनवर थांबली यशवंतपूर-कोरबा वैनगंगा एक्स्प्रेस

गडचिरोली : जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या वडसा रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची व प्रवाशांची वर्दळ असताना यशवंतपूर-कोरबा या वैनगंगा एक्स्प्रेसचा थांबा सुरू झालेला नव्हता. प्रवाशांनी याबाबत लोकप्रतिनिधींमार्फत रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर हा थांबा अखेर गुरूवार दि. १५ फेब्रुवारीपासून सुरू झाला. यावेळी खासदार अशोकजी नेते आणि आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रेल्वेगाडीला वडसा स्थानकावरून रवाना करण्यात आले.

यावेळी भाजपचे लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, तालुका अध्यक्ष सुनील पारधी, तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, महामंत्री वसंता दोनाडकर, रेल्वे मंडळाचे अप्पर प्रबंधक टी.जगताप, मंडळाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक दिलीप सिंह, सहाय्यक प्रबंधक अविनाशकुमार आनंद, माजी नगराध्यक्ष शालू दंडवते, अविनाश पाल, मोहन गायकवाड तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी खा.नेते व आमदार कृष्णा गजबे यांनी गाडीचे चालक व इतर कर्मचाऱ्यांना पेढे भरवून त्यांचे स्वागत केले.

अनेक दिवसांपासून स्थानिक व्यापारी, नागरिक आणि लांबच्या प्रवासावर जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची या गाडीला थांबा देण्याची मागणी होती. खासदार नेते यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे वारंवार भेट घेऊन त्यांना रेल्वे प्रवाशांची समस्या सांगत या थांब्याची मागणी केली. अखेर त्यांनी ही मागणी मान्य केली.

कोरानाकाळ संपल्यानंतरही थांबा होता बंदच! 

कोरोनाकाळात सुपरफास्ट व पॅसेंजर अशा सर्वच गाड्यांचा वडसा स्थानकावर थांबा बंद होता. नंतर कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर हळूहळू सर्व गाड्या चालू झाल्या. कोरोनाच्या पुर्वी कोरबा-यशवंतपूर वैनगंगा सुपरफास्ट ट्रेनचाही थांबा देसाईगंज (वडसा) येथे होता. परंतु कोरानाकाळ संपल्यानंतरही हा थांबा बंदच होता. त्यामुळे रेल्वेच्या प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती.

Web Title: Yesvantpur Korba Wainganga Express finally halted at Vadsa railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.