शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

अभ्यासविना गेले गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष, यावर्षीही परिस्थिती तशीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 5:00 AM

आरटीई अंतर्गत खासगी, विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव असतात. शासनाच्या या याेजनेतून गेल्या सात-आठ वर्षांपासून जिल्ह्यातील हजाराे गरीब विद्यार्थी इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. प्रवेश व शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती संबंधित शाळांना शासनाकडून केली जाते.

ठळक मुद्देकाेराेनाचा फटका : आरटीईअंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची व्यथा

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : बालकांचा माेफत सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार, अधिनियमाअंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये माेफत प्रवेश दिला जाताे. गतवर्षी सन २०२०-२१ या सत्रात शेकडाे विद्यार्थ्यांना माेफत प्रवेश मिळाला. मात्र काेराेना महामारीच्या संकटामुळे गतवर्षी या याेजनेतून प्रवेश झालेल्या व शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष अभ्यासाविना गेले. आरटीई अंतर्गत खासगी, विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव असतात. शासनाच्या या याेजनेतून गेल्या सात-आठ वर्षांपासून जिल्ह्यातील हजाराे गरीब विद्यार्थी इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. प्रवेश व शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती संबंधित शाळांना शासनाकडून केली जाते.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत तसेच बाराही पंचायत समितीस्तरावरील गटसाधन केंद्राच्या माध्यमातून आरटीई प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणी केली जात आहे. अनलाॅकनंतर आता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 

विद्यार्थ्यांना साधने पुरविणे आवश्यक

आरटीईअंतर्गत प्रवेश घेऊन शिकत असलेले मुले व मुली सामान्य कुटुंबातील आहेत. काेराेना संकटामुळे गेल्या वर्षभर शाळा सुरू झाल्या नाही. अनेकांच्या पालकांकडे स्मार्ट फाेनही उपलब्ध नाही. अशा विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने स्मार्ट फाेन व इतर साहित्य पुरविणे गरजेचे आहे.शहरी भागातील काही पालकांकडे स्मार्ट फाेन आहेत. मात्र ग्रामीण भागातील पालकांकडे स्मार्ट फाेन नाहीत. शिवाय अभ्यासाचे विविध साहित्यही उपलब्ध हाेत नाही. याबाबत शिक्षण विभागाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के माेफत प्रवेश याेजनेची अंमलबजावणी केली जात आहे. या याेजनेतून प्रवेश घेऊन शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील आहेत. काेराेना लाॅकडाऊनमुळे हे विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत जाऊन गतवर्षी शिक्षण घेऊ शकले नाही. ऑनलाईन स्वरूपात शिक्षक व पालकांच्या सहकार्याने काही विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. यंदा आतापर्यंत ४९४ विद्यार्थ्यांची माेफत प्रवेशासाठी निवड झाली आहे. - हेमलता परसा, प्राथमिक शिक्षणाधिकारी

गेले वर्ष वाया गेले !

माझ्या मुलाचा गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रात आरटीई अंतर्गत शाळेत इयत्ता पहिलीत प्रवेश झाला. मात्र काेराेना महामारीच्या संकटामुळे चवथीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष भरल्या नाही. वर्षभर प्रत्यक्ष वर्ग सुरू न झाल्याने माझ्या मुलाने शाळा बघितली नाही. घरीच राहुन आम्ही त्याच्याकडून थाेडाफार अभ्यास करून घेतला.- प्रेमिला मेश्राम, पालक

काेराेना महामारीमुळे खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे माेठे शैक्षणिक नुकसान झाले. इयत्ता पहिली ते चवथीपर्यंच्या विद्यार्थ्यांना माेबाइलच्या साहाय्याने ऑनलाईन शिक्षण देणे फारसे प्रभावी ठरत नाही. माझा मुलगा आरटीअंतर्गत गतवर्षी चवथीला हाेता. त्याने घरीच राहून शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. अनेकदा अडचणी येत हाेत्या.- विनाेद भैसारे, पालक

आरटीई २५ टक्के प्रवेशाची याेजना सामान्य पालकांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. आर्थिक ऐपत नसताना चांगल्या शाळेत शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे. काेराेना लाॅकडाऊनमुळे वर्षभर विद्यार्थी घरी राहिले. त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. लाॅकडाऊनमुळे माझ्या पाल्यांसह अनेकांचे नुकसान झाले. - कैलास म्हशाखेत्री

 

टॅग्स :Educationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्या