यंदा गुरूजी देणार नव्या खुर्च्यांवरून धडे
By Admin | Updated: May 14, 2014 02:20 IST2014-05-13T23:34:11+5:302014-05-14T02:20:35+5:30
जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये अनेक वर्षापूर्वी पुरविण्यात आलेल्या जुन्या खुर्च्यांवर बसून शिक्षक शिकवित आहेत.

यंदा गुरूजी देणार नव्या खुर्च्यांवरून धडे
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये अनेक वर्षापूर्वी पुरविण्यात आलेल्या जुन्या खुर्च्यांवर बसून शिक्षक शिकवित आहेत. जुन्या व्यवस्थित नसलेल्या टेबलवरून शैक्षणिक लिखान करीत आहे. यामुळे त्यांना त्रास होत आहे. शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मागणीची दखल घेऊन जि.प. च्या शिक्षण विभागाने यावर्षी जिल्हा परिषद शाळांमध्ये नवे टेबल व खुर्च्यांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सध्या स्थितीत जिल्ह्यातील ७0 टक्के शाळांमध्ये अत्याधूनिक टेबल व खुर्च्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. यामुळे यंदा गुरूजी नव्या खुर्च्यांवर बसून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणार आहेत.
जिल्ह्यातील बाराही तालुके मिळून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक अशा एकूण १ हजार ५५७ शाळा आहे. या शाळांमध्ये एकूण २ हजार ५0८ वर्ग खोल्या आहे. या शाळातील मुख्याध्यापक, शिक्षकांना शालेय कामकाज व अध्यापनासाठी अत्याधुनिक टेबल व खुर्च्यांची व्यवस्था करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. सदर पारित ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला. यावर जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेऊन सदर ठराव पारित केला. यासाठी २१८.५७ लाखाच्या अतिरिक्त केंद्र सहाय्य निधीला मंजूरी दिली. जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाला १७५ लक्ष रूपयाचा निधी प्राप्त झाला. यापैकी ५४.६४ लक्ष रूपयाच्या खर्चातून शिक्षण विभागाने कंत्राटदारांमार्फत जिल्ह्यातील ७0 टक्के शाळांमध्ये अत्याधुनिक स्वरूपाचे टेबल व खुच्र्याचा पुरवठा केला आहे. एकूण २ हजार ५0८ टेबल, खुच्र्यांचा पुरवठा करण्याचे नियोजन आहे. (प्रतिनिधी)