मातीच्या बिळात वेडाराघू पक्ष्यांनी थाटला संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:00 IST2020-05-17T05:00:00+5:302020-05-17T05:00:47+5:30
कोकडी गावापासून एक किमी अंतरावरून गाढवी नदी वाहते. नदी किनाऱ्यावरील वेडाराघू पक्ष्यांनी बिळ तयार केले आहेत. क्षणाक्षणातच जमिनीपासून ५ ते २० फुटावरून सतत गोलगोल उडताना हे पक्षी दिसतात. याच ठिकाणी नदीकाठाच्या पाळीवर मातीत वेडाराघू पक्ष्यांनी शेकडो बिळ खोदून स्वत:चे नैसर्गिक घरटे तयार केले आहेत. खचलेल्या पाळीच्या मातीवर एकही झाडेझुडूपे नाही.

मातीच्या बिळात वेडाराघू पक्ष्यांनी थाटला संसार
अतुल बुराडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : पानवठ्याच्या परिसरात सहज आढळणाऱ्या वेढाराघू पक्ष्याचे घरटे (बिळ) पूर्णत: मातीचे सुरक्षित व नैसर्गिक असतात. गाढवी नदीच्या कोकडी नदी काठावरील पाळीवर मातीत बिळ तयार करून वेडाराघू पक्ष्यांची जगरहाटी सुरू आहे. विणीच्या हंगामात वेडाराघू पक्ष्यांनी तयार केलेले बिळ (घरटे) अचंबित करणारे असेच आहे.
कोकडी गावापासून एक किमी अंतरावरून गाढवी नदी वाहते. नदी किनाऱ्यावरील वेडाराघू पक्ष्यांनी बिळ तयार केले आहेत. क्षणाक्षणातच जमिनीपासून ५ ते २० फुटावरून सतत गोलगोल उडताना हे पक्षी दिसतात. याच ठिकाणी नदीकाठाच्या पाळीवर मातीत वेडाराघू पक्ष्यांनी शेकडो बिळ खोदून स्वत:चे नैसर्गिक घरटे तयार केले आहेत. खचलेल्या पाळीच्या मातीवर एकही झाडेझुडूपे नाही. त्यामुळे खरटे तयार केलेल्या पाळीचा भाग आता झाडाझुडूपांपासून मुक्त आहे. येथे एक ते दोन फूट अंतरावर बिळ तयार केले आहेत. या बिळाचा व्यास ५ ते ७ सेंमी इतका आहे.
प्रत्येक जीवाला जीवन जगताना स्वत:ची वंशवाढ झाली पाहिजे, अशी अपेक्षा असते. त्यात मानवासारखा बोलू न शकणारा पक्षी असुरक्षित असतो. त्यामुळे स्वत:चे रक्षण करून अंडे टाकण्यासाठी, पिलांचे संगोपन करणे, शिकारी पक्ष्यांपासून बचाव करण्यासाठी वेडाराघू पक्षी मातीत बिळ तयार करण्याचा मार्ग स्विकारतो. अंडीघालून पक्ष्याच्या जन्मापर्यंत बिळ तयार करण्याचे काम सुरू असते.
विणीचा हंगाम चालू असेपर्यंत वेडाराघू पक्षी नदी किनाऱ्यावरील मातीच्या उभ्या पाळीवर बिळ तयार करतात. इवलासा वेडाराघू पक्षी आपल्या काळ्या चोचिने मातीत बिळ अर्थात घरटे तयार करतात. वेडाराघू हा कीटकभक्षी आहे. माशा, माकोडे, लहान-मोठे कीटक खाऊन तो जगत असतो.
सदर पक्षी हा आकर्षक दिसत असून बऱ्याच नागरिकांचे लक्ष वेधून घेत असते. आपल्या परिसरात अनेक पक्षी असून ग्रामीण भागात चुकून त्यांची शिकार केली जाते. पक्ष्यांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यावर लिखान व संशोधन केल्यास संवर्धन, संगोपन, संरक्षण होण्यास मदत होऊ शकते. यासाठी पुढाकाराची गरज आहे.
असा असतो वेडाराघू पक्षी
वेडाराघू हा हिरवट रंगाचा पोपटासारखा दिसणारा लहान पक्षी आहे. सतत गोलगोल घिरट्या तो घालत असतो. लांब काळी चोच असून त्याचे पंख चकाकत असतात. शेपटीकडील भाग कोनासारखा असून कोनाच्या शिरोबिंदुतून बारिक, लहान सरळ तीर दिसतो. इकडून तिकडे उडणारा हा वेडाराघू पक्षी अतिशय चंचल असल्याचे जाणवत असते.