रोजगाराच्या शोधात मजुरांची परराज्यांत धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST2021-02-07T04:33:51+5:302021-02-07T04:33:51+5:30

उमेश पेंड्याला लाेकमत न्यूज नेटवर्क गुड्डीगुडम : अहेरी उपविभागासह गडचिराेली जिल्ह्यात काेणतेही माेठे उद्याेगधंदे नाहीत. कसलेही कारखाने नाहीत. ...

Workers run abroad in search of employment | रोजगाराच्या शोधात मजुरांची परराज्यांत धाव

रोजगाराच्या शोधात मजुरांची परराज्यांत धाव

उमेश पेंड्याला

लाेकमत न्यूज नेटवर्क

गुड्डीगुडम : अहेरी उपविभागासह गडचिराेली जिल्ह्यात काेणतेही माेठे उद्याेगधंदे नाहीत. कसलेही कारखाने नाहीत. शेती व्यवसाय व हंगामी राेजगार साेडल्यास इतर पाच ते सहा महिने येथील मजुरांना रिकाम्या हाताने राहावे लागते. रिकाम्या हाताने राहून पाेट कसे भरायचे, असा प्रश्न सतावत असलेल्या गुड्डीगुडम परिसरात अहेरी उपविभागातील शेकडाे मजूर सामानाचे गाठाेळे घेऊन मिळेल त्या वाहनाने परराज्यांत स्थलांतरित हाेत आहेत.

गेले नऊ महिने काेराेना महामारीने राेजगाराची पूर्णत: वाट लावली. शेतीमधून निघणाऱ्या अत्यल्प उत्पादनावर अहेरी उपविभागातील आदिवासी व बिगर आदिवासी मजुराने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा चालविला. आता पाेटाची खळगी भरण्यासाठी परराज्यांत जाऊन काम केल्याशिवाय पर्याय नाही, हे ओळखून या भागातील मजूर लगतच्या तेलंगणा, आंध्रप्रदेश, आदी राज्यांत मिरची ताेडणीसह विविध कामे करण्यासाठी जात आहेत. आंध्रप्रदेश राज्यातील मधेपूर, चेन्नूर, गुंटूर, कबंम, श्रीरामपूर, आदी भागांत बरेच मजूर जात असल्याचे दिसून येते. प्रस्तुत प्रतिनिधीशी बाेलताना अनेक मजुरांनी मिरची ताेडणी व इतर कामांसाठी परराज्यांत जात असल्याचे सांगितले.

बाॅक्स...

हाेळीपर्यंत हंगाम चालणार

तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यांत गेल्या दाेन ते तीन वर्षांपासून मिरची लागवडीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. परिणामी गडचिराेली जिल्ह्यासह विदर्भाच्या अनेक भागांतील मजुरांकडून त्या राज्यातील सधन शेतकरी मिरची ताेडणीचे काम करून घेतात. मिरची ताेडणीच्या हंगामास जाेरदार सुरुवात झाली असून, हा हंगाम हाेळी सणापर्यंत राहणार आहे. अहेरी उपविभागातील बरेच मजूर हाेळीचा सणही तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यांत साजरा करून कामाचा माेबदला अर्थात मजुरीची रक्कम घेऊन मार्च महिन्याच्या अखेरीस परतणार आहेत.

Web Title: Workers run abroad in search of employment