पीएचसीच्या कामाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 01:02 AM2018-01-31T01:02:48+5:302018-01-31T01:03:05+5:30

चामोर्शी तालुक्यात लखमापूर बोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामाला सुरूवात झाली आहे. रूग्णांसाठी नवीन इमारत सोयीचे होणार आहे.

The work of PHC started | पीएचसीच्या कामाला सुरूवात

पीएचसीच्या कामाला सुरूवात

googlenewsNext
ठळक मुद्देलखमापूर बोरीत इमारत : नागरिकांसाठी होणार सोयीचे

लोकमत न्यूज नेटवर्क
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यात लखमापूर बोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामाला सुरूवात झाली आहे. रूग्णांसाठी नवीन इमारत सोयीचे होणार आहे.
लखमापूर बोरी येथे २० वर्षापूर्वी अ‍ॅलोपॅथीक दवाखान्याची निर्मिती करण्यात आली होती. या दवाखान्याचे कामकाज चार वर्ष सुरळीत चालले. त्यानंतर ते पूर्णत: बंद पडले. परिणामी नागरिकांना आरोग्य सेवेसाठी तालुकास्तर गाठावे लागत होते. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर लखमापूर बोरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे. त्यानंतर इमारतीसाठी निधी मंजूर झाला. जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्या हस्ते इमारतीचे भूमिपूजन पार पडले. त्यानंतर आता इमारत बांधकामाला सुरूवात झाली आहे.
२०१९ पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. लखमापूर बोरी परिसरात असलेल्या वाघधरा, बल्लू, वाकडी, भिसी, हळदी माल, कळमगाव येथील नागरिकांसाठी सोयीचे झाले आहे.

Web Title: The work of PHC started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.