साडेसहा हजार मजुरांना काम
By Admin | Updated: June 4, 2014 00:04 IST2014-06-04T00:04:54+5:302014-06-04T00:04:54+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चामोर्शी उपविभागातील चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात मे महिन्यात मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात आली.

साडेसहा हजार मजुरांना काम
चामोर्शी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चामोर्शी उपविभागातील चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात मे महिन्यात मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात आली. मे महिन्यात उपविभागात ३६ हजार ९६३ जॉब कार्ड वितरीत करून ६ हजार ५४८ मजुरांना चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात रोजगार देण्यात आला. या माध्यमातून आजपर्यंत ८१ हजार १८७ मनुष्य दिवस रोजगार निर्मिती करण्यात आली.
चामोर्शी उपविभागातर्गत चामोर्शी तालुक्यात ७६ ग्रामपंचायती व मुलचेरा तालुक्यात १७ ग्रामपंचायती अशा एकूण ९३ ग्रामपंचायती आहेत. वित्तीय वर्ष २0१४-१५ च्या नियोजनात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ५ कामे घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यापैकी ग्रामपंचायतस्तरावर ३ कामे व यंत्रणा स्तरावर दोन कामे सुरू करण्याचे आदेश तालुकास्तरीय वरीष्ठ अधिकार्यांना चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी एम. देवेंदरसिंह यांनी दिले आहे. चामोर्शी व मुलचेरा तालुक्यातील शेतकर्यांना पाण्याच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून चामोर्शी तालुक्यातील २१0 विहिरी व मुलचेरा तालुक्याकरिता १00 विहिरींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तालुक्यात मजगीचे कामे मोठय़ा प्रमाणात घेण्यात आले आहे.
खरीप, रबी पिके मोठय़ा प्रमाणात शेतकरी घेऊ शकतील व उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी यंत्रणा यांनी जास्तीत जास्त कामे सुरू करावी, मजुरांनी मोठय़ा प्रमाणात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी करून रोजगार उपलब्ध करून घ्यावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी एन. देवेंदरसिंह यांनी केले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चामोर्शी विभागात वित्तीय वर्ष २0१३-१४ मध्ये ८२६ कामे सुरू करण्यात आली होती. ही सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. त्यानंतर २0१४-१५ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत चामोर्शी उपविभागात १९६ कामे सुरू करण्यात आली आहेत. त्या दृष्टीने चामोर्शी उपविभागातील ९३ ग्रामपंचायतीमार्फ त उत्कृष्ठरित्या काम करण्यात आले आहे. गाव पातळीवर मजुरांना काम मिळावा या उद्देशाने उपविभागामार्फत यंत्रणा कामाला लागली आहे. त्यामुळे ग्रामीण पातळीवरील रोहयो मजुरांनी कामाची मागणी करून रोजगार उपलब्ध करावा असे आवाहन करण्यात आले आहे.