ग्रामपंचायतींची कामे ठप्प

By Admin | Updated: November 19, 2016 01:59 IST2016-11-19T01:59:20+5:302016-11-19T01:59:20+5:30

विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हाभरातील ग्रामसेवकांनी ७ नोव्हेंबरपासून धरणे आंदोलन सुरू केले होते.

The work of the Gram Panchayats jam | ग्रामपंचायतींची कामे ठप्प

ग्रामपंचायतींची कामे ठप्प

ग्रामसेवकांचे आंदोलन : देसाईगंज व मुलचेरा तालुक्यातील सचिवांनी सुपूर्द केल्या चाव्या
देसाईगंज/मुलचेरा : विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हाभरातील ग्रामसेवकांनी ७ नोव्हेंबरपासून धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाचे तीन टप्पे यापूर्वी पार पडलेत. चौथ्या टप्प्यात गुरूवारी जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांनी आपल्या पंचायत समितीतील बीडीओकडे आपल्या ग्रामपंचायतींच्या दप्तराच्या चाब्या सूपूर्द केल्या. त्यामुळे ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झाले आहे.
ग्रामसेवक युनियन तालुका शाखा देसाईगंजच्या वतीने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी उमेशचंद्र चिलबुले यांच्याकडे तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या चाब्या, शिक्के व निवेदन सुपूर्द केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिवाकर निंदेकर, सचिव योगेश टिकले, कोषाध्यक्ष भोयर, सल्लागार बी. एस. राऊत, पांडुरंग पेशणे, अनिल आडे, दयाराम श्रीरामे, रवी आंबोने, कल्पना राऊत, प्रभास सिडाम, शलिनी टेंभूर्णे, बंडू उईके, खापरे, सी. एस. राऊत, लोचन शेंडे, यशोदा पेंदोर, रामटेके उपस्थित होते. ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे नागरिकांची कामे अडत असल्याने ग्रामसेवकांच्या समस्या तत्काळ सोडवाव्या, असे निवेदनात म्हटले.
ग्रामसेवक युनियन शाखा मुलचेराच्या वतीने तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या कपाटाच्या चाब्या व शिक्के संवर्ग विकास अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले. गावपातळीवर सरपंचांच्या उपस्थितीत सर्व अभिलेख ग्रामपंचायतीच्या कपाटात ठेवून कुलूपबंद करण्यात आले. त्यानंतर पंचनामा व कपाटाच्या चाब्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनिल बंडावार, उपाध्यक्ष नंदकिशोर कुमरे, सहसचिव धर्मराव राऊत, सचिव पराग मुलकलवार हजर होते.

Web Title: The work of the Gram Panchayats jam