एटापल्ली येथे महिला मेळावा

By Admin | Updated: January 6, 2016 01:57 IST2016-01-06T01:57:29+5:302016-01-06T01:57:29+5:30

येथील सांस्कृतिक भवन येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने रविवारी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

Women's Meet at Atapalli | एटापल्ली येथे महिला मेळावा

एटापल्ली येथे महिला मेळावा

महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन : स्वच्छता अभियान; गुणवंतांचा सत्कार
एटापल्ली : येथील सांस्कृतिक भवन येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने रविवारी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यादरम्यान महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मेळाव्याचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सरिता राजकोंडवार होत्या. यानिमित्त संपूर्ण शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर एटापल्ली शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी महिला मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महिला आरोग्य शिबिराच्या माध्यमातून शेकडो महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी पंचायत समिती सभापती दीपक फुलसंगे, उपसभापती संजय चरडुके, पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, नगर परिषद सभापती जितेंद्र टिकले, बाबुराव गंपावार, तानाजी दुर्वा, गीता दासरवार, सुनीता चांदेकर, विनोद पत्तीवार, ज्योती ढोके, वंदना उपगनलावार, वैशाली सोनटक्के, ईश्वर ढोके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Women's Meet at Atapalli