शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
2
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
3
Top Marathi News LIVE Updates: अंबरनाथमध्ये मुख्य जलवाहिनीला मोठी गळती; लादी नाका परिसरात लाखो लीटर पाणी वाया
4
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
5
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
6
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
7
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
8
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
9
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
10
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
11
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
12
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
13
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
14
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
15
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
16
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
17
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
18
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
19
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची दारूविक्री अड्ड्यावर धाड

By admin | Updated: January 3, 2015 01:15 IST

दारूविक्री बंद करण्यासंदर्भात ३१ डिसेंबरचा अल्टीमेटम देऊनही गावात दारूविक्री सुरूच ठेवल्याने गावातील महिलांनी दारूविक्रीच्या अड्ड्यावर धाड टाकून दारूविक्रेत्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

वैरागड : दारूविक्री बंद करण्यासंदर्भात ३१ डिसेंबरचा अल्टीमेटम देऊनही गावात दारूविक्री सुरूच ठेवल्याने गावातील महिलांनी दारूविक्रीच्या अड्ड्यावर धाड टाकून दारूविक्रेत्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
शासनाने गडचिरोली जिल्ह्यात दारूविक्रीला बंदी घातली असली तरी कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे दारूची खुलेआम विक्री केली जात होती. त्यामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागले होते. गावाचा व कुटुंबाचा विकास करण्यासाठी दारूविक्री बंद केल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नसल्याने कढोली येथील महिलांनी आठ दिवसांपूर्वी सभा घेऊन दारूविक्रीला प्रतिबंध करणारी स्वतंत्र समिती स्थापन केली. गावातील सर्वच दारूविक्रेत्यांना ३१ डिसेंबर २०१४ चा अल्टीमेटम दिला होता. मात्र पोलिसांशी संधान असल्याने निगरगट्ट व मुजोर झालेल्या दारूविक्रेत्यांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करीत दारूविक्री सुरूच ठेवली. त्यामुळे संतप्त झालेल्या गावातील महिलांनी अवैध दारूविक्री अड्ड्यांवर धाड टाकून दारू जप्त केली. दारूविक्रीविरोधात कारवाई केली जात असताना एका दारूविक्रेत्याने महिलेच्या बोटाचा चावा घेऊन जखमी केले. दारू पकडल्यानंतर याबद्दलची माहिती गावकऱ्यांनी कुरखेडा पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र दारूविक्रेत्याला अटक करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याने महिलांनी दारूविक्रेत्याला अटक करण्याची मागणी लावून धरली. एवढेच नाही तर दारूविक्रेता पोलिसांच्या वाहनात बसण्यासाठी तयार नसतानाही पोलीस मात्र दारूविक्रेत्याला एखाद्या महत्वाच्या व्यक्तिप्रमाणे सौजन्याची वागणूक देत होते.
पुढे पोलिसांचे वाहन, त्यामागे अवैध दारूविक्रेते, पोलीस व गावकऱ्यांची गर्दी अशा स्थितीत दारूविक्रेत्यांना गावाबाहेर काढण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी दारूविक्रेत्याला गाडीत बसविले. महिलांनी २ जानेवारी रोजीसुद्धा काही दारूविक्रेत्यांच्या अड्ड्यांवर धाड टाकून दारू जप्त केली. (वार्ताहर)
कुरखेडा पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह
महिलांनी हिंमत करून पोलिसांना दारूविक्रेत्यांना पकडून देऊनही कुरखेडा पोलीस दारूविक्रेत्याला अटक करण्यास तयार नव्हते. त्याचबरोबर त्याला एखाद्या व्हीआयपी व्यक्तीप्रमाणे सौजन्याची वागणूक देत होते. पोलिसांच्या अशा वागणुकीमुळे कढोली परिसरातील नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरूवात केली आहे.