दारूबंदीसाठी महिला एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST2019-12-23T05:00:00+5:302019-12-23T05:00:25+5:30

तालुक्यातील सालमारा, पाथरगोटा, पळसगाव आणि जोगीसाखरा येथील मुक्तिपथ गाव संघटन कार्यकत्यांची क्लस्टर कार्यशाळा मुक्तिपथ तालुका चमूद्वारे घेण्यात आली. दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी तसेच आसपासच्या गावातील दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

Women unite for drunkenness | दारूबंदीसाठी महिला एकवटल्या

दारूबंदीसाठी महिला एकवटल्या

ठळक मुद्देजोगीसाखरा येथे क्लस्टर कार्यशाळा : परिसरातील दारू विक्रेत्यांवर कारवाईबाबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील सालमारा, पाथरगोटा, पळसगाव आणि जोगीसाखरा येथील मुक्तिपथ गाव संघटन कार्यकत्यांची क्लस्टर कार्यशाळा मुक्तिपथ तालुका चमूद्वारे घेण्यात आली. दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी तसेच आसपासच्या गावातील दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
जोगीसारखा येथे पार पडलेल्या बैठकीला सरपंच चंदू गरथडे, पोलीस पाटील वासुदेव शेडमके, मुक्तिपथ संचालक मयूर गुप्ता, तालुका संघटक नीलम हरिणखेडे, रितेश कुमार यांच्यासह गावसंघटनेचे ३२ कार्यकर्ते उपस्थित होते.
सालमारा, पाथरगोटा आणि पळसगाव येथील संघटनेने गावातील दारूविक्री बंद केली आहे. तसेच ती टिकून राहण्यासाठी गाव संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे. दारूबंदी करताना व ती टिकवून ठेवताना आलेले अनुभव या कार्यशाळेत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. सोबतच दारूबंदी असल्याने बदललेले गावाचे वातावरण याविषयीसुद्धा सांगितले.
मुक्तिपथ संघटना व पोलीस कारवाई करीत असले तरी जोगीसाखरा गावात अद्याप दारूविक्री सुरू आहे. त्यामुळे गावात असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. सालमारा, पाथरगोटा आणि पळसगाव या गावांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. दारूविक्री बंद असलेल्या गावातील लोक आता जोगीसाखरा येथे दारू पिण्यासाठी येत आहेत. त्यामुळे चारही गावांच्या प्रयत्नातून दारूविक्री कशा प्रकारे बंद करता येईल यावर चर्चा झाली. जोगीसाखरातील दारूविक्री बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार गाव संघटनेने केला.

दारूविक्रेत्यांना बजावणार नोटीस
जोगीसाखरासह परिसरातील अनेक गावांमध्ये दारूविक्री सुरू आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये दारूविक्री बंद आहे. अशा गावातील दारूडे जोगीसाखरा येथे दारू पिण्यासाठी येत आहेत. गावातील शांतता व सुव्यवस्थेला धोका आहे. त्यादृष्टीने जोगीसाखरातील दारू बंद करण्याकरिता गावातील १२ दारूविक्रेत्यांची यादी गाव संघटनेने तयार केली आहे. या विक्रेत्यांना पोलीस पाटलांद्वारे नोटीस दिले जाणार आहे. तसेच या विक्रेत्यांनी इतर गावात जाऊन दारू विकण्याचा प्रयत्न केल्यास तत्कार पोलीस स्टेशनला तक्रार करणार, असा निर्धारही गाव संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला.

Web Title: Women unite for drunkenness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.