शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील महिला सरपणाच्या शोधात पुन्हा दाहीदिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 19:55 IST

गॅसची सातत्याने दरवाढ होत असल्याने पुन्हा ग्रामीण भागात धूर निघणार काय, असाही प्रश्न पडला आहे. धूर मुक्त गाव योजनेचा खेळखंडोबा झाला असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

ठळक मुद्देगॅस महागल्याचा परिणामसर्वसामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील अनेक गावांत शासनाच्या योजनेतून गॅस वितरण करण्यात आले. विविध योजनेतून गॅस वितरण केले, पण आता गॅस महागल्याने पैसे आणायचे कुठून? घरोघरी मातीच्या चुली, अशी म्हण पुन्हा दिसू लागली आहे. सिलिंडरमुळे नवीन पिढीला चुलीचा विसर पडला होता. मात्र, गॅसची सातत्याने दरवाढ होत असल्याने पुन्हा ग्रामीण भागात धूर निघणार काय, असाही प्रश्न पडला आहे. धूर मुक्त गाव योजनेचा खेळखंडोबा झाला असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. (Women in rural areas turn right again in search of firewood)ग्रामीण भागात गॅस सिलिंडरचा वापर वाढला होता. घरोघरी चुली पेटविल्या जात नाहीत, तर काही घरी चुली हद्दपार झाल्या होत्या. ग्रामीण भागात महिला व पुरुष वर्षभरापासून परिसरातून सरपण जमा करत होते. गॅस मिळाल्याने तेही बंद झाले, पण पुन्हा अजून सरपण गोळा करण्याची वेळ आली आहे. स्वयंपाक गॅसवर, तर अंघोळीकरिता लागणारे गरम पाणी गॅसवरच गरम करण्यात येत होते. ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर कुटुंबीयांचे आर्थिक बजेट, वीज बिल आणि सिलिंडरमुळे पूर्णत: गरिबांचे बजेट कोलमडले आहे.सततची नापिकी व कोरोनामुळे अनेक कुटुंबांना रोजगारापासून दूर राहावे लागत आहे. रोजगारासाठी भटकंती, साहित्यामध्ये दरवाढ, तर कामामध्ये मात्र वेतन कमी असल्याने नागरिकांना महागडा गॅस परवडणार काय? महागाई गगनाला भिडत आहे. त्यामुळे सिलिंडर घेणे अनेक कुटुंबीयांना अशक्य झाले आहे. येत्या उन्हाळ्यात ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावर सरपणाची मोळी दिसणार आहे. महिलांसोबत पुरुषही परिसरातून सरपण गोळा करून सायकलद्वारे आणत असल्याचे चित्र लवकरच दिसून येणार आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास