मंत्रिमंडळ विस्तारात महिला आमदारांना संधी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2022 20:13 IST2022-11-14T20:13:00+5:302022-11-14T20:13:51+5:30
Gadchiroli News मंत्रिमंडळ विस्तारात महिला आमदारांना संधी मिळून महिला मंत्री नक्की असतील, असा विश्वास भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

मंत्रिमंडळ विस्तारात महिला आमदारांना संधी मिळणार
गडचिरोली : राज्यात भाजपमध्ये सर्वात जास्त महिला आमदार आहेत. आताच्या मंत्रिमंडळात महिला मंत्री नाही, मात्र पुढे होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात महिला आमदारांना संधी मिळून महिला मंत्री नक्की असतील. केवळ महिला आणि बालकल्याण खातेच नाही, तर इतरही महत्त्वाचे खाते सांभाळण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असा विश्वास भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
भाजपच्या महिला मेळाव्यासाठी गडचिरोलीत आल्या असताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या. वाघ यांनी पुढील निवडणुकांमध्ये महिलांचे योगदान मोठे असेल असे सांगताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोलीसह इतर जिल्ह्यातील अनेक प्रश्न निकाली निघतील, असा विश्वास व्यक्त केला.