महिला शेतकऱ्यांनी जाणले कमी लागवड खर्चाचे कृषीतंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:25 IST2021-06-29T04:25:05+5:302021-06-29T04:25:05+5:30
जुनी वडसा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ‘महिला कसली, शेती पिकली’ या उक्तीवर भर देण्यात आला. देसाईगंज मुख्यालयाच्या कृषी सहायक ...

महिला शेतकऱ्यांनी जाणले कमी लागवड खर्चाचे कृषीतंत्र
जुनी वडसा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ‘महिला कसली, शेती पिकली’ या उक्तीवर भर देण्यात आला. देसाईगंज मुख्यालयाच्या कृषी सहायक कल्पना ठाकरे यांनी १० टक्के रासायनिक खताची मात्रा कमी करून आर्थिक खर्चात बचत व्हावी, याकरिता नत्र खतांऐवजी ॲझाेला वनस्पतीचा वापर करावा, असे मार्गदर्शन केले. नैनपूर येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी ॲझाेला व हिरवळीच्या खतांचा वापर केला आहे. रासायनिक कीटकनाशकांना पर्याय म्हणून निंबोळी अर्क तयार करणे, फवारणी करणे आदी कामे महिलांनी समूहाने आवर्जून करावी. शेतीचे नियोजन करून व समूहाने कामे केल्याने बरेच फायदे मिळतात. परिस्थितीनुसार खरीप हंगामाचे नियोजन करावे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. यावेळी भात लागवड पध्दतीविषयी रूपेश मेश्राम, खत व्यवस्थापन, वेगवेगळे प्रकार, भात लागवड पध्दतीविषयी कृषी पर्यवेक्षक युगेश रणदिवे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला तालुका कृषी आधिकारी नीलेश गेडाम, कृषी मंडळ अधिकारी रूपेश मेश्राम, भूषण कुथे, नगरसेविका अश्विनी कांबळे आदी उपस्थित होते.
===Photopath===
270621\5556img-20210625-wa0041.jpg
===Caption===
मंञी थोरात यांचे कडून निळवंडे कालवे पहाणी फोटो