महिला शेतकऱ्यांनी जाणली करडई पिकाची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST2021-03-31T04:36:41+5:302021-03-31T04:36:41+5:30
करडी हे रबी हंगामातील कमी खर्चिक व महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. अवर्षणावर मात करण्याची क्षमता या पिकामध्ये ...

महिला शेतकऱ्यांनी जाणली करडई पिकाची माहिती
करडी हे रबी हंगामातील कमी खर्चिक व महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. अवर्षणावर मात करण्याची क्षमता या पिकामध्ये जास्त असल्याने इतर रबी पिकांपेक्षा कोरडवाहू शेताकरिता हे पीक शेतकऱ्यांना वरदान ठरणारे आहे. त्यामुळे करडई पिकाच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी वळण्याची गरज आहे, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. प्रायोगिक तत्त्वावर करडई पिकाचे वाण ए. के. एस-२०७ ची लागवड शंकर भाजीपाले व मोतीलाल कुकरेजा यांनी केली हाेती. त्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन पीक प्रात्यक्षिकासह शेतीदिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी नीलेश गेडाम, मंडळ कृषी अधिकारी रुपेश मेश्राम, कृषी पर्यवेक्षक वासुदेव ताडपल्लीवार, कृषी सहायक कल्पना ठाकरे उपस्थित होते.