अन त्या महिलेचा मृतदेह पोहोचला घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:36 IST2021-03-18T04:36:52+5:302021-03-18T04:36:52+5:30
तालुक्यातील तुमनूर चेक येथील अंकुबाई चुक्कया निष्ठुरी (६० वर्ष) ही महिला एका आठवड्यापासून आजारी होती. सदर महिलेला उपचारांसाठी ...

अन त्या महिलेचा मृतदेह पोहोचला घरी
तालुक्यातील तुमनूर चेक येथील अंकुबाई चुक्कया निष्ठुरी (६० वर्ष) ही महिला एका आठवड्यापासून आजारी होती. सदर महिलेला उपचारांसाठी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मंगळवारला सदर महिलेचा मृत्यू झाला. घरातील परिस्थिती हलाखीची असल्याने मृतदेह अहेरीवरून तुमनूरला कसा न्यायचा, अशी अडचण निर्माण झाली. मृतदेह नेण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नव्हते. नातेवाईकांनी सदर बाब आदिवासी विद्यार्थी संघाचे तुमनूर चेक येथील माजी सरपंच किरण वेमूला यांना माहिती मिळाली. त्यांनी सदर बाब भ्रमणध्वनीवरून जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना कळविली. कंकडालवार यांनी मदत करण्याबाबत कार्यकर्त्यांना सांगितले. सदर महिलेचा मृतदेह अहेरीवरून सिरोंचा तालुक्यातील तुमनूरला नेण्यासाठी स्वखर्चातून गाडीची व्यवस्था व आर्थिक मदत आदिवासी विद्यार्थी संघाकडून करण्यात आली. यावेळी अहेरी पं.स.चे सभापती भास्कर तलांडे, संघाचे शहर अध्यक्ष प्रशांत गोडसेलवार, राकेश सड़मेक, सुदामा हलदर, प्रकाश दुर्गे यांनी रुग्णालयात जाऊन मृतदेह गाडीने तुमनूर येथे पाठविला.