ट्रकच्या धडकेत महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:49 IST2021-02-27T04:49:25+5:302021-02-27T04:49:25+5:30

जोगीसाखरा येथील लालाजी मेश्राम यांच्या मुलीच्या लग्न समारंभासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील मांगली येथील कालीदास मेश्राम (५५), कालीद्रा कालीदास मेश्राम (५०), ...

Woman killed in truck crash | ट्रकच्या धडकेत महिला ठार

ट्रकच्या धडकेत महिला ठार

जोगीसाखरा येथील लालाजी मेश्राम यांच्या मुलीच्या लग्न समारंभासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील मांगली येथील कालीदास मेश्राम (५५), कालीद्रा कालीदास मेश्राम (५०), चंद्रभागा महादेव मेश्राम चिचगाव (६५), चैताली पुण्यवान सहारे (४) हे आले हाेते. लग्नसमारंभ आटाेपून आपल्या दुचाकीने आरमारीकडे जात असताना रामपगर फाट्यावर एमएच ३४ एबी ६११४ क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली. या अपघातात चाैघेही जखमी झाले. अपघाताची माहिती जोगीसाखरा ग्रामपंचायतचे उपसरपंच संदीप ठाकूर, दिलीप घोडाम, राजकुमार भोयर यांना माहीत होताच त्यांनी घटनास्थळ गाठून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बाेलाविली. सर्वांना रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान चंद्रभागा महादेव मेश्राम यांचा मृत्यू झाला. इतर तिघांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अधिक तपास आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगाबर सूर्यवंशी करीत आहेत.

Web Title: Woman killed in truck crash