शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

क्षेत्रसहायकाच्या संगनमताने सागवानतस्करीचा गोरखधंदा, फर्निचरच्या आठ दुकानांतून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2023 13:00 IST

अतिदुर्गम कंबलपेठात वनविभागाची मोठी कारवाई: १९ ठिकाणी एकाचवेळी धाडी, आसरअल्ली जंगलातून केली तोड 

कौसर खान, सिरोंचा: अतिदुर्गम आसरअल्ली वनपरिक्षेत्रात (ता.सिरोंचा) एकाचवेळी १९ फर्निचर दुकानांवर धाडी टाकून वनविभागाने झाडाझडती घेतली. यावेळी तब्बल ९ दुकानांमध्ये  वनपरिक्षेत्रातील दुर्मिळ व मौल्यवान सागवान आढळून आले. सुमारे साडेसात लाखांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. धक्कादायक म्हणजे क्षेत्रसहाय्यकाच्या संगनमतानेच हा गोरखधंदा सुरु असल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.  

आसरअल्ली परिक्षेत्रातील आसरअल्ली, जंगलपल्ली, अंकिसा कंबलपेठा या गावांत १९ फर्निचर दुकाने आहेत.   वनविभागातील वनकर्मचाऱ्यांची पथके तयार करुन २३ रोजी एकाचवेळी छापे टाकण्यात आले.  तेथील ८ दुकानांमध्ये दुर्मिळ सागवान लाकडे व   फर्निचर तयार करण्यासाठी कापून ठेवलेल्या फळ्या असा लाखोंचा मुद्देमाल आढळून आला. हा मुद्देमाल आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील असल्याचे स्पष्ट झाल्यावर दुकानदारांची कसून चौकशी केली. यात क्षेत्रसहाय्यक कादीर शेख याच्या आशीर्वादानेच जंगलातून सागवान कापून रातोरात विल्हेवाट लावली जात असल्याचे उघड झाले. त्यामुळेक्षेत्र  सहायक कादीर शेखला तडकाफडकी निलंबित करण्यात आले. उपवनसंरक्षक पूनम पाटे यांच्याम मार्गदर्शनाखाली उपविभागीय वनाधिकारी पी.डी.बुधनवर,  वनपरिक्षेत्र अधिकारी पी.बी.झाडे यांनी ही कारवाई केली. कारवाईत ५० वनाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

यांच्यावर झाली कारवाई

रवींद्र मीनाबाबू कासोजी , संतोष साबय्या गोत्तरी, समय्या पोचालू गंप्पा, राजकुमार समय्या पोटे (सर्व रा.आसरअल्ली), देवेंद्र लच्चन्ना गोत्तुरी ,किशोर शंकर कोरटला, राजेंद्र अंकन्ना गोत्तुरी (तिघे रा. रा.जंगलपल्ली), सुरेश चंद्रय्या अरिंदा (रा.अंकिसा) यांच्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांच्याकडून एकूण सात लाख ५१ हजार ५९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेवारस ३४ हजार ३११ रुपयांचे सागवान देखील आढळले. एकूण सात लाख ८५ हजार ९०५ रुपयांचा हा सर्व मुद्देमाल वनविभागाने ताब्यात घेतला आहे.परवाने कायमस्वरुपी रद्द

फर्निचर मार्टमध्ये आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील दुर्मिळ सागवान आढळून आले. या सर्व दुकानदारांचा फर्निचरमार्टचा परवाना २३ जून रोजीपासून कायमस्वरुपी रद्द केल्याची माहिती उपवनसंरक्षक पूनम पाटे यांनी दिली. दरम्यान, आतापर्यंतची ही मोठी कारवाई मानली जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी