अटक करणार नाही, मदत करणार; पाच हजार रुपये दे!
By गेापाल लाजुरकर | Updated: August 11, 2023 19:54 IST2023-08-11T19:53:20+5:302023-08-11T19:54:07+5:30
पैशांची मागणी करणारा आरमाेरीचा पाेलिस एसीबीच्या जाळ्यात

अटक करणार नाही, मदत करणार; पाच हजार रुपये दे!
गडचिराेली : अपघाताचा गुन्हा नाेंद असलेल्या आराेपीची माेटारसायकल जप्त न करणे व त्याला अटक न करण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी आरमाेरी येथील पाेलिस नाईकाने केली. सदर तक्रारदाराने पाेलिस नाईकाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली असता, एसीबीच्या पथकाने पाेलिस नाईकाला शुक्रवार ११ ऑगस्ट राेजी अटक करून गुन्हा दाखल केला.
प्रकाश हनुमंत जाधव (३९) असे गुन्हा दाखल झालेल्या आराेपी पाेलिस नाईकाचे नाव आहे. तक्रारदाराच्या विराेधात आरमाेरी पाेलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे तक्रारदाराला सदर प्रकरणात मदत हवी हाेती. तक्रारदाराच्या याच संकटाचा फायदा पाेलिस नाईक प्रकाश जाधव यांनी घेतला. जाधव यांनी तक्रारदाराला अटक न करणे व दुचाकी जप्त न करण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केली. परंतु तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी एसीबीमध्ये तक्रार दाखल केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल लोखंडे यांच्या पर्यवेक्षणात पाेलिस निरीक्षक श्रीधर भोसले यांनी तक्रारदाराच्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा रचला. यात पडताळणीदरम्यान तक्रारदाराला आरमाेरी पाेलिस स्टेशनमध्ये आराेपी जाधव याने दाखल गुन्हात मोटार सायकल जप्त न करण्यासाठी, अटक करून जेलमध्ये न पाठविण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच पंचासमक्ष मागणी केली, यावरून आरोपी जाधव याच्याविरुध्द आरमाेरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पाेलिस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलिस हवालदार नथ्थू धोटे, पाेलिस नाईक किशोर जाैंजारकर, पाेलिस शिपाई संदीप उडाण, संदीप घोरमोडे, प्रफुल डोलीकर आदींनी केली.