Will the industrial development assurance be fulfilled? | औद्योगिक विकासाची आश्वासनपूर्ती होणार का?
औद्योगिक विकासाची आश्वासनपूर्ती होणार का?

ठळक मुद्देमुख्यमंत्री आज कालेश्वरममध्ये : प्रकल्पाच्या उद्घाटनाला उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर उभारलेल्या कालेश्वरम या मोठ्या उपसा सिंचन प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री सी.चंद्रशेखर राव शुक्रवारी मेडिगड्डात येणार आहेत. सिरोंचा तालुक्याच्या काठावर मुख्यमंत्री येत आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेले जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचे आश्वासन कधी पूर्ण करणार? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे.
वन आणि खनिज संपत्तीने विपूल असूनही जिल्ह्याच्या विकासात या संपत्तीचा हातभार लावण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आलेले नाही. अनेक वर्षानंतर लॉयड्स मेटल्स कंपनीने मिळालेल्या लिजच्या जागेतून लोहखनिज काढण्यास सुरूवात केली होती, पण ते कामही बंद पडल्यामुळे औद्योगिक विकासाचे स्वप्न धुळीत मिळत आहे. वास्तविक लॉयड्स मेटल्सपाठोपाठ अनेक मोठ्या कंपन्या या जिल्ह्यात विविध उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेतील असे वातावरण तयार झाले होते. परंतू कधी नक्षल दहशतीचे कारण देत तर कधी प्रशासकीय उदासीनतेमुळे सुरू झालेले उद्योग बंद पाडण्यासाठी सरकारी यंत्रणा हातभार लावत आहे. त्यामुळे जिल्ह्यात येऊ घातलेले अनेक उद्योग या जिल्ह्यातून काढता पाय घेत आहेत. यातून बेरोजगारी वाढत आहे.
होळींचा विधानसभेत आवाज
‘मेक इन गडचिरोली’ या आपल्या महत्वाकांक्षी संकल्पनेतून जिल्ह्यात उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी पुढाकार घेणाऱ्या आमदार डॉ.देवराव होळी यांनी गुरूवारी विधानसभेत आवाज उठविला. जिल्ह्यातील खनिज संपत्तीचा उपयोग होत नाही. आहे ते उद्योगही बंद पडत असल्यामुळे सरकारने ठोस पावले उचलावी अशी मागणी त्यांनी सभागृहात उपस्थित केली.


Web Title: Will the industrial development assurance be fulfilled?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.