बेडगावात वन्यजीव सप्ताह साजरा

By Admin | Updated: October 9, 2016 01:47 IST2016-10-09T01:47:03+5:302016-10-09T01:47:03+5:30

कोरची तालुक्यातील बेडगाव वन परिक्षेत्राच्या हद्दीत दुर्गम गावांमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त शुक्रवारी रॅली काढण्यात आली.

Wildlife Week celebrated at Badgauta | बेडगावात वन्यजीव सप्ताह साजरा

बेडगावात वन्यजीव सप्ताह साजरा

मोटारसायकल रॅली काढली : गडवे यांनी केले मार्गदर्शन
कोरची : कोरची तालुक्यातील बेडगाव वन परिक्षेत्राच्या हद्दीत दुर्गम गावांमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त शुक्रवारी रॅली काढण्यात आली.
या रॅलीचे नेतृत्त्व वन परिक्षेत्राधिकारी एम. के. गडवे यांनी केले. यावेळी मोटारसायकलीवरून फिरून वन कर्मचाऱ्यांनी बेडगाव-कोरची-मसेली-कोटरा- मरकेकसा- बोटेकसा-बेतकाठी-जामनारा-बोरी-बेलगावघाट-सातपुती-टेमली-कोचीनारा आदी भागात रॅली काढली. या रॅलीचा समारोप बेडगाव येथे करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना वन परिक्षेत्राधिकारी एम. के. गडवे यांनी वन कर्मचाऱ्यांनी गावागावांत जाऊन वन्यप्राण्यांचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे, तसेच वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्याबाबत प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
यावेळी क्षेत्र सहायक शेंडे, कुमरे, तेलंग, ठाकरे, पोटावी, हेपट आदी उपस्थित होते. रॅलीच्या निमित्ताने विविध गावांमध्ये लोकांनी वन्यजीवांंबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Wildlife Week celebrated at Badgauta