नवऱ्याची दारू सोडण्यासाठी बायकोचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 17:23 IST2024-07-09T17:22:23+5:302024-07-09T17:23:54+5:30
येल्लातील ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव पारित: शासकीय योजनांचा लाभ न देण्याचा इशारा

Wife's initiative to give up husband's alcohol
लोकमत न्यूज नेटवर्क
मुलचेरा : तालुक्यातील येल्ला येथे शुक्रवारी पार पडलेल्या ग्रामसभेत अवैध दारूविक्री बंदीचा ठराव पारित करून विक्रेत्यांकडून २० हजारांचा दंड वसूल करण्यासह पोलिस कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास निश्चितच गाव दारूमुक्त होणार, अशी आशा ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.
येल्ला येथे अवैध दारूविक्री सुरू असल्याने विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. या गावामुळे जवळपासच्या अवैध दारूविक्री बंद असलेल्या गावांतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या गावातील ठोक दारू विक्रेते विविध गावांतील किरकोळ दारू विक्रेत्यांना दारूचा पुरवठा करतात. शुक्रवारी ग्रामसभेत अवैध दारूविक्री बंदीच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली.
सभेला सरपंच दिवाकर उराडे, पोलिस पाटील शंकर सेडमाके, पानेवार, साईनाथ पानेवार, माजी पोलिस पाटील यशवंत कोडापे, श्यामराव कोडापे, ग्रामपंचायत सदस्य ललिता कोडापे, कल्पना दहागावकर, तंमुस अध्यक्ष सुरेश रामटेके, शंकर पानेवार, रामदास टेकुलवार, मुक्तिपथचे रुपेश अंबादे व टीम उपस्थित होती. या सभेत मुक्तिपथ गाव संघटनेचे शंकर शेडमाके, दिवाकर उराडे, साईनाथ पानेवार, सुरेश रामटेके, यशवंत कोडापे, कल्पना दहागावकर, अलका कोडापे, मीना रामटेके, ललिता कोडापे, सईबाई उराडे, वनिता उराडे, अनिता शेडमाके, निशा रामटेके, वर्षा शेडमाके, दुर्गा टेकुलवार, शोभा टेकुलवार, यशवंताबाई कोडापे, मीनाक्षी गौरवार, कल्पना रामटेके, निर्मल आत्राम, शामला पानेवार, ललिता टेकुलवार, वनिता दंडकेवार, निर्मला हजारे, रंगुबाई टेकुलवार, अमाका आत्राम, रांगूबाई आत्राम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
दंडासह पोलिस कारवाई करणार
सभेमध्ये दारूविक्री बंदीचा ठराव पारित करण्यात आला. यामध्ये दारूविक्रेत्याकडून पहिल्यांदा दंड २० हजार रुपये, तसेच दुसऱ्यांदा दारूविक्री करताना आढळून आल्यास दंडासह पोलिस कारवाई करणे तसेच कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही, असेही ठरवण्यात आले. सदर निर्णयाची अंमलबजावणी केली.