जिल्हा परिषद शिक्षकांचेच पगार उशिरा का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:34 IST2021-05-15T04:34:56+5:302021-05-15T04:34:56+5:30
गडचिराेली : राज्य शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हाेत असताना जिल्हा परिषद शिक्षकांना मात्र महिनाभर प्रतीक्षा करावी ...

जिल्हा परिषद शिक्षकांचेच पगार उशिरा का?
गडचिराेली : राज्य शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हाेत असताना जिल्हा परिषद शिक्षकांना मात्र महिनाभर प्रतीक्षा करावी लागते. आमचेच वेतन उशिरा का हाेते, असा प्रश्न जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
शिक्षकांची वेतन बिले तयार करण्याचे काम पंचायत समितीमार्फत पार पाडले जाते. पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे शिक्षकांच्या वेतनासाठी अनुदानाची मागणी केली जाते. त्याच वेळी शिक्षकांचे पगार बिलही बनविणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश पंचायत समित्यांमधील कर्मचारीवर्ग जाेपर्यंत जिल्हा परिषदेकडून अनुदान प्राप्त हाेत नाही, ताेपर्यंत पगार बिले बनवत नाही. अनुदान मिळाल्यानंतर पगार बिले बनविण्याची घाई सुरू हाेती. घाईगडबडीत पगार बिले चुकतात. पुन्हा ती परत पाठविली जातात. पुन्हा नव्याने बनवून जिल्हा परिषदेकडे सादर केली जातात. या सर्व बाबींमध्ये १५ ते २० दिवसांचा कालावधी उलटत असल्याने महिन्याच्या शेवटीच शिक्षकांचे पगार हाेतात.
बाॅक्स....
वेतनप्रणालीची गरज
बहुतांश कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठी वेगवेगळ्या वेतनप्रणाली लागू करण्यात आल्या आहेत; त्यामुळे कागदी घाेडे नाचविण्याचा त्रास व वेळ वाचतो. शिक्षक वगळता, इतर कर्मचाऱ्यांसाठी त्या-त्या विभागाने वेगवेगळ्या शिक्षणप्रणाली अवलंबिल्या आहेत. शिक्षकांसाठीही वेतनप्रणालीचा उपयाेग झाल्यास वेतनाला हाेणारा विलंब थांबण्यास मदत हाेईल.
काेट.....
घराचे हप्ते कसे फेडणार?
शिक्षकांचे वेतन महिन्याच्या शेवटी तर साेडाच; दुसऱ्या महिन्याशिवाय हाेत नाही. अनेक शिक्षकांवर बँकांचे कर्ज आहे. वेळेवर वेतन झाल्याने बँकांचे हप्ते थकतात. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेतन हाेईल, यासाठी उपाययाेजना करण्याची गरज आहे.
- बापू मुनघाटे, शिक्षक
..........................
शिक्षकांचे वेतन उशिरा हाेणे ही नित्याचीच बाब झाली आहे. धानाेरा तालुक्यातील शिक्षकांचे मागील दाेन महिन्यांपासून वेतनच झाले नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
- देवेंद्र लांजेवार, शिक्षक
..........................
शिक्षकांचे वेतन वेळेवर व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेकडे अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला. मात्र शिक्षकांचे वेतन उशिराच हाेते. इतर कर्मचाऱ्यांच्या संख्येत शिक्षकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे काही तांत्रिक बाबी निर्माण हाेत असल्याने वेतन हाेण्यास उशीर हाेताे.
- गुरुदेव नवघडे, शिक्षक
...............
बाॅक्स.....
१६६३
जिल्ह्यातील एकूण जि.प. शाळा
.....
४७५९
एकूण शिक्षक