शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

विजेचे बिल भरूनही नागरिकांना अंधारात का राहावे लागते ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:49 IST

उन्हाळ्यात वाढले विजेचे ब्रेकडाऊन : नियोजनाचा दिसतोय अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली असताना शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. महावितरण दरमहा ग्राहकांना वीज बिल पाठविते, तसेच वीज बिलाचा भरणा वेळेत न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. वेळोवेळी वीजपुरवठा खंडित होत असले तर आम्ही वीज बिल का भरावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दुरुस्तीसाठी ग्रामीण भागात नागरिकांची गैरसोय

  • ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाल्यास दुरुस्तीसाठी महावितरण कंपनीकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे अनेक गावात वीज कर्मचारी वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाही.
  • परिणामी दुसऱ्या गावात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वीज दुरुस्तीची कामे करावी लागत असल्याचे वास्तव आहे. प्रत्येक गावात महावितरण कर्मचारी नेमावे.

विजेची मागणी वाढली किती पुरवठा किती?विजेची मागणी उन्हाळ्यात अधिक असते. त्यामुळे महावितरणने उन्हाळा लागण्यापूर्वीच नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र दरवर्षी उन्हाळा आणि विजेची लपंडाव हे समीकरणच तयार झाले आहे. विजेच्या मागणीनुसार पुरवठा होत नाही. परिणामी वीज गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ग्रामीण भागात सुरू झाले भारनियमनग्रामीण भागात तर विजेसंबंधी विविध समस्या आहेत. कधी वीज येते, आणि कधी जाते. हे ग्रामीण भागातील नागरिकांना समजायला मार्ग नाही. एक प्रकारे ग्रामीण भागात अघोषित भारनियमन सुरू असल्याची ओरड ग्रामीण भागातील वीज ग्राहकांची आहे.

विजेच्या लपंडावाची काय आहेत कारणे ?

  • मेंटेनन्सची कामे : महावितरण मेंटेनन्सची कामे सुरू आहेत, असे सांगून विविध भागांतील वीजपुरवठा तासनतास बंद ठेवत आहेत.
  • ब्रेकडाऊनचा प्रकार : महावितरणचे ब्रेकडाऊन तर पाचवीलाच पुजले आहे. ब्रेकडाऊननंतर वीजपुरवठा बंद होत असून, अंधाराचा सामना नागरिकांना करावा लागतो.
  • मागणी जास्त पुरवठा कमी : यावर्षी मार्च महिन्यापासूनच ऊन तापले. एप्रिल तर हीट ठरला आहे. अशा वेळी दिवसभरात अनेकदा वीजपुरवठा बंद केला जात असल्याने रोष व्यक्त होत आहे.

शहरातही लपंडावशहरातही विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. कधी सकाळीच तर कधी रात्री अचानक वीज गुल होत आहे. भर उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित राहत आहे. रात्रीही अनेकवेळा वीज खंडित होत असल्याने झोपमोड होत आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीelectricityवीज