धान खरेदी घोटाळ्यात आरोपींना वाचवतयं कोण? २१ आरोपी, पकडले फक्त दोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 16:03 IST2025-05-10T15:57:58+5:302025-05-10T16:03:45+5:30

धान गैरव्यवहारः पोलिस म्हणतात, शोध सुरु

Who is saving the accused in the paddy purchase scam? Only two of the 21 accused were caught | धान खरेदी घोटाळ्यात आरोपींना वाचवतयं कोण? २१ आरोपी, पकडले फक्त दोन

Who is saving the accused in the paddy purchase scam? Only two of the 21 accused were caught

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
धान खरेदी ते भरडाईपर्यंतच्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात पाच गुन्हे नोंद झाले. यात २१ आरोपींचा समावेश आहे, पण धान खरेदी केंद्रांवरील केवळ दोन ग्रेडर (विपणन अधिकारी) पोलिसांच्या ताब्यात आहेत. धान भरडाई केंद्र मालकासह अधिकारी व खरेदी केंद्राचे संचालक असे तब्बल १९ जण पोलिसांना गुंगारा देत आहेत.


आदिवासी विकास महामंडळाच्या कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालय अंतर्गत देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेद्वारे केलेल्या धान खरेदीत २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये मिळून तब्बल दहा हजार क्विंटलची तफावत आढळली. बारदान्यामध्येही अफरातफर उघडकीस आली होती. दोन्ही वर्षात एकूण ३ कोटी ९५ लाखांचा गैरव्यवहार उघडकीस आला होता. 


१९ एप्रिल रोजी प्रादेशिक उपव्यवस्थापक एम.एस. बावणे, विपणन अधिकारी सी. डी. कासारकर, एच.व्ही. पेंदाम व संबंधित अध्यक्ष, सचिव , संचालक अशा एकूण १७ जणांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेला आहे. विपणन अधिकारी सी. डी. कासारकर, एच.व्ही. पेंदाम या दोघांनाच अटक करण्यात पोलिसांना यश आले. उर्वरित आरोपी अद्याप मोकळेच आहेत. त्यांना कोण वाचवतयं याची चर्चा आहे. 


बडे मासेही सापडेनात

  • धान भरडाईमध्ये देखील लाखोंचा गैरव्यवहार उघडकीस आला होता. याप्रकरणी आरमोरी ठाण्यात जनता राईस मिलच्या मालकावर २ मे रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.
  • ३ मे रोजी देसाईगंजातील अजय राईस मिलचे मालक भास्कर किसन डांगे, सोनल पोहा उद्योग मिल, देसाईगंजच्या मालक माया प्रभाकर डांगे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला, तर चौथ्या प्रकरणात विद्युत जोडणी नसताना धान भरडाई केल्याचे दाखवून काळ्या बाजारातील तांदूळ पुरवठा केल्याचा ठपका ठेवत कुरुड येथील शारदा स्टिम प्रोडक्ट संस्थेचे मालक राजकुमार अर्जुनदास मोटवाणी यांच्यावर गुन्हा नोंद झाला. आरोपींमध्ये बडे मासे आहेत. मात्र, यातील एकालाही अटक करण्यात पोलिसांना अजून यश आलेले नाही. 
  • दरम्यान, कुरखेडाचे उपअधीक्षक 3 रवींद्र भोसले म्हणाले, या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपी कोणीही असो त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

Web Title: Who is saving the accused in the paddy purchase scam? Only two of the 21 accused were caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.