मोहफूल दारू अड्डा उद्ध्वस्त

By Admin | Updated: January 30, 2017 03:33 IST2017-01-30T03:33:34+5:302017-01-30T03:33:34+5:30

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आष्टीचे पोलीस निरिक्षक दीपक लुकडे यांनी आपल्या सहकारी

The whimsical drunk band destroyed | मोहफूल दारू अड्डा उद्ध्वस्त

मोहफूल दारू अड्डा उद्ध्वस्त

आठ लाखांचा मुद्देमाल : राममोहनपूर जंगलात पोलिसांची धाड
आष्टी : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आष्टीचे पोलीस निरिक्षक दीपक लुकडे यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह रविवारी राममोहनपूर जंगल परिसरात धाड टाकून येथील मोठ्या स्वरूपात असलेला मोहफूल दारू अड्डा उद्ध्वस्त केला व येथून एकूण ८ लाख ११ हजार ८०० रूपयांचा माल घटनास्थळीच नष्ट केला.
राममोहनपूर जंगल परिसरात नाल्याच्या किनारी काही ड्रम जमिनीमध्ये पुरून ठेवल्याचे निदर्शनास आले. या जागेची पोलिसांनी तपासणी केली असता, येथे बरेचसे रिकामे ड्रम व मोहफूल सडवा भरून असलेले ड्रम आढळून आले. काही ड्रममध्ये दारू गाळण्याचे लोखंडी ड्रमही मिळून आले. ४ लाख २० हजार रूपये किमतीचा मोहफूल सडवा, ३ लाख ६० हजार रूपयांची २ हजार ४०० लिटर दारू, २५ हजार २०० रूपये किमतीचे ४२ प्लास्टिक ड्रम, ६ हजार ६०० रूपये किमतीचे ११ नग लोखंडी ड्रम असा एकूण ८ लाख ११ हजार ८०० रूपयांचा माल पोलिसांनी पकडला. सदर माल नाशवंत असल्याने पोलिसांनी तो घटनास्थळावरच नष्ट केला. ही कारवाई एसडीपीओ गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार लुकडे, पीएसआय संदीप कापडे, विजय जगदाळे, सहायक फौजदार संघरक्षीत फुलझेले यांच्यासह पोलीस शिपाई व हवालदारांनी केली. (प्रतिनिधी)

हे आहेत दारू अड्ड्याचे सूत्रधार
४पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राममोहनपूर जंगल परिसरातील सदर मोहफूल दारू अड्डा राममोहनपूर गावातील बबलू रॉय, संजय नायपती, विश्वनाथ दास, सुशील दास, महादेव भक्तो यांच्यासह गावातील १० ते १२ व्यक्ती मिळून चालवितात. दारूभट्टी चालवून ते दारूची विक्री करतात.

Web Title: The whimsical drunk band destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.