जेवण तर चांगले देताच स्वच्छताही बाळगा ; कारवाई होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 14:13 IST2024-11-18T14:11:24+5:302024-11-18T14:13:18+5:30
Gadchiroli : अन्न प्रशासन करते कारवाई

While serving good food, keep cleanliness; Action will be taken
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरात खवय्यांची कमी नाही. हॉटेल व ढाब्यावरील जेवण करण्याची अनेकांना आवड आहे. हॉटेल व ढाब्यावरील पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी अनेक कुटुंबं आठवड्यातून किंवा पंधरवड्यातून एकदा तरी जातात; परंतु, येथे स्वच्छता पाळली जाते काय, हा प्रश्न आहे. केवळ हॉटेल चकचकीत ठेवून चालत नाही तर स्वयंपाकगृहात स्वच्छता नसेल तर परवाना निलंबित तसेच फौजदारी कारवाई होऊ शकते.
हॉटेल, ढाबे तसेच खाद्यपदार्थाची विक्री होणाऱ्या प्रत्येक प्रतिष्ठानची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून नियमित केली जाते. हे काम सातत्याने सुरू असले तरी काही हॉटेलचालक नियमांचे पालन करीत नाही. यामुळेच हॉटेल्स चकाचक दिसत असले तरी त्यांचे किचन मात्र गलिच्छ असते, अस्वच्छता आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. गडचिरोली शहरात २० च्यावर लहान-मोठे हॉटेल आहेत. यापैकी जवळपास १० हॉटेल मोठे असून, दिसायला चकचकित आहेत. तेथे खानपानविषयक सर्वच सुविधा उपलब्ध आहेत; परंतु, अनेकदा येथेही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. प्रसंगी परवाना निलंबनासह फौजदारी कारवाईसुद्धा केली जाते. किचनमध्ये स्वच्छता नसल्यास किवा खाद्यपदार्थांच्या नमुन्यात त्रुटी आढळून आल्यास कारवाईपूर्वी हॉटेलचालकांना सुधारणा करण्याची संधी पत्राद्वारे दिली जाते. सुधारणा न झाल्यास कारवाई केली जाते. किचनमध्ये स्वच्छता नसल्यास किवा खाद्यपदार्थांच्या नमुन्यात त्रुटी आढळून आल्यास कारवाईपूर्वी हॉटेलचालकांना सुधारणा करण्याची संधी पत्राद्वारे दिली जाते. सुधारणा न झाल्यास कारवाई केली जाते.