ई-पीक पाहणी सुरूच असताना पुन्हा धान विक्री नाेंदणीची कटकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:40 IST2021-09-21T04:40:45+5:302021-09-21T04:40:45+5:30

राज्यात महसूल विभागाने ई-पीक पाहणी ही ऑनलाईन नाेंदणी माेहीम सुरू केली. ही प्रक्रिया पूर्ण होण्याच्या आतच आधारभूत शासकीय खरेदी ...

While e-crop inspection is going on, there is a dispute over registration of paddy sales again | ई-पीक पाहणी सुरूच असताना पुन्हा धान विक्री नाेंदणीची कटकट

ई-पीक पाहणी सुरूच असताना पुन्हा धान विक्री नाेंदणीची कटकट

राज्यात महसूल विभागाने ई-पीक पाहणी ही ऑनलाईन नाेंदणी माेहीम सुरू केली. ही प्रक्रिया पूर्ण होण्याच्या आतच आधारभूत शासकीय खरेदी केंद्रांवर २० सप्टेंबरपासून धान विक्रीसाठी नावनोंदणी करायची असल्याने सन २०२१-२२ मधील चालू वर्षाचा सातबारा देताना तलाठ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शासनाची कोणतीही शासकीय मदत, पीक विमा, पीक कर्ज, खरेदी केंद्रावर धान विकायचे असतील तर ई-पीक पाहणी या ऑनलाइन ॲप्लिकेशनवर आपला पीकपेरा शेतकऱ्यांना चढवायचा आहे. मुळातच या याबद्दल अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत. शेतकऱ्यांनी माहिती नाेंदविल्यानंतर ती माहिती तलाठ्यांच्या लाॅगिनवर उपलब्ध हाेईल. तलाठी ही माहिती तपासून काही त्रुटी असल्यास पूर्तता केल्यानंतर सातबारावर अद्ययावत करतील. तलाठ्याला लागवडीचे क्षेत्र, सामायिक खाते, कोरडवाहू की ओलीत, शेतात सिंचनाचे साधन कोणते? विहीर, बोरवेल की अन्य आणखी इतर हे सगळे तपासून नंतर शेतकऱ्यांना सातबारा द्यावा लागणार आहे. मार्केटिंग फेडरेशन धान खरेदी केंद्रावर धान विकण्यासाठी २० सप्टेंबरपासून नोंदणी करायची असल्याने सातबारा घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होणार आहे. ई-पीक पाहणी ॲपवर नाेंदणीची भानगड असतानाच आता धान विक्रीसाठी नाेंदणीची कटकट लागल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

बाॅक्स

अद्ययावत साताबारासाठी ई-पीक नाेंदणी आवश्यक

ई-पीक पाहणी ऑनलाइन ॲपद्वारे पहिल्यांदा शेतकऱ्यांनी नोंदणी करावी व त्यानंतर तलाठ्यांकडून कन्फर्मेशन करून घ्यावे, नंतर धान विक्रीसाठी नोंदणी करावी, तरच शेतकऱ्यांना सन २०२१-२२ चा पीकपेरा चढवलेला सातबारा मिळेल. तलाठी साजांमध्ये शेतकरी गर्दी करतील आणि या गर्दीत बरीच कामे पूर्ण होणार नाहीत. कार्यालयात एकच तारांबळ उडणार आहे. त्यामुळे आधारभूत शासकीय खरेदी केंद्रावर धान्य विक्री करण्यासाठी नोंदणी करण्याची तारीख पुढे ढकलण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

बाॅक्स

फाेटाे अपलाेड करताना अडचणी

जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी अल्पशिक्षित आहेत. प्रत्येकांकडे ॲन्डाॅईड माेबाइल नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी नाेंदणीच केली नाही. जे शेतकरी ॲपवर नाेंदणी करीत आहेत, त्यांना पिकांचा फाेटाे काढून अपलाेड करताना अडचणी येत आहेत. ॲपमधील कॅमेरा ओपन हाेत नाही. तसेच लाेकेशन पकडत नाही. तर कधी ॲपमधील प्राेसेस पूर्णता मागे येत असल्याच्या अडचणी आहेत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: While e-crop inspection is going on, there is a dispute over registration of paddy sales again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.