शाळेची पहिली घंटा केव्हा वाजणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST2021-06-28T04:24:38+5:302021-06-28T04:24:38+5:30
२०२०-२१ या शैक्षणिक सत्रात २३ नोव्हेंबरपासून इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यानंतर पाचवी ते नववीचे वर्ग सुरू ...

शाळेची पहिली घंटा केव्हा वाजणार?
२०२०-२१ या शैक्षणिक सत्रात २३ नोव्हेंबरपासून इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यानंतर पाचवी ते नववीचे वर्ग सुरू झाले. मात्र ७ एप्रिलपासून परत लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे मागील वर्षी फक्त पाच महिने शाळा झाली. मात्र द्वितीय सत्रात परीक्षा झालीच नाही. विद्यार्थ्यांचा निकाल घटक चाचणी व अंतर्गत गुण देऊन लावण्यात आला. परीक्षा न देताही विद्यार्थी पास झाले. दहावी व बारावीची परीक्षा झाली नाही. शिक्षण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार दहावीचा निकाल शाळेत तयार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेचा निकाल १०० टक्के लागणार आहे. मात्र हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी शाळेकडून घेण्यात आली आहे.
बाॅक्स
पालकांना आदेशाची प्रतीक्षा
२०२१-२२ या सत्रातील शाळा २८ जूनपासून अप्रत्यक्षरित्या सुरू होत आहेत. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. तेथील परिस्थितीनुसार त्या भागातील शाळा सुरू करण्याचा शासनाचा विचार आहे. परंतु अजूनपर्यंत स्पष्ट आदेश नसल्याने या सत्रातील शाळेची पहिली घंटा वाजणार नाही. विद्यार्थी शाळेची पहिली घंटा केव्हा वाजणार म्हणून वाट पाहत आहेत. शाळा केव्हा सुरू हाेणार म्हणून पालकांकडून वारंवार विचारणा हाेत आहे. स्पष्ट आदेशाची पालकांना प्रतीक्षा आहे.