सर्वाधिक रुग्ण कशाचे? ताप, सर्दी-डोकेदुखीचे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 05:00 IST2021-12-27T05:00:00+5:302021-12-27T05:00:21+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात गडचिराेली जिल्ह्यासह शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातूनही रुग्ण औषधाेपचारासाठी येतात. विशेष म्हणजे सावली, मूल, ब्रम्हपुरी तसेच गाेंडपिपरी तालुक्यातील रुग्ण याठिकाणी येतात. येथे अनेक तज्ज्ञ डाॅक्टरांकडून तपासणी केली जाते. या रुग्णालयाची ओपीडी सकाळी व सायंकाळी अशी दाेन वेळेत चालते. याशिवाय आंतररुग्ण विभागात २४ तास सेवा सुरू असते. सर्वसामान्य व गरीब रुग्णांची भिस्त याच रुग्णालयावर आहे.

सर्वाधिक रुग्ण कशाचे? ताप, सर्दी-डोकेदुखीचे !
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात नेत्र, बीपी, शुगर, बालराेग, सामान्य रुग्ण, त्वचा, कान, नाक, घसा, दंत आदींसह विविध विभागांच्या ओपीडी आहेत. मात्र, या रुग्णालयात जनरल ओपीडीमध्ये सर्दी, खाेकला, तापाचे सर्वाधिक रुग्ण असतात.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गडचिराेली जिल्ह्यासह शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातूनही रुग्ण औषधाेपचारासाठी येतात. विशेष म्हणजे सावली, मूल, ब्रम्हपुरी तसेच गाेंडपिपरी तालुक्यातील रुग्ण याठिकाणी येतात. येथे अनेक तज्ज्ञ डाॅक्टरांकडून तपासणी केली जाते. या रुग्णालयाची ओपीडी सकाळी व सायंकाळी अशी दाेन वेळेत चालते. याशिवाय आंतररुग्ण विभागात २४ तास सेवा सुरू असते. सर्वसामान्य व गरीब रुग्णांची भिस्त याच रुग्णालयावर आहे. तालुकास्तरावरील सरकारी रुग्णालयात रुग्णांची गर्दी हाेत असते. अलीकडे ही गर्दी आता कमी झाल्याचे दिसत आहे.
डोळ्यांची निगा कशी राखाल?
दरराेज दिवसातून दाेन ते तीनदा डाेळे थंड पाण्याने धुवावे. संगणकावर अधिक काम करणाऱ्यांनी मध्ये मध्येे विश्रांती घेऊन डाेळ्यावरून हात फिरवावा. जेणेकरून डाेळ्यांना विश्रांती मिळेल.
या विभागात झाली सर्वाधिक ओपीडी
- गडचिराेलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्र, बीपी, शुगर, जनरल ओपीडी, त्वचा व कान, नाक, घसा विभागात रुग्ण माेठ्या संख्येने तपासणी व औषधाेपचारासाठी येतात.
- सर्दी, खाेकला, ताप, डाेकेदुखी आदींचेही रुग्ण बरेच येतात. दरम्यान, विविध आजारांच्या रक्ताच्या चाचणी करण्यासाठी लॅबमध्ये रुग्णांची गर्दी असते.
- दर गुरूवारी अस्थी व बालरुग्णांची गर्दी असते. याशिवाय आयुष (हाेमिओपॅथी विभाग), एचआयव्ही विभागातही रुग्ण येत असतात.
- विशेष म्हणजे पावसाळ्यात या रुग्णालयात ओपीडीत जास्त रुग्ण असतात.
दंत विभागात अत्यल्प रुग्णसंख्या
- जिल्हा सामान्य रुग्णालयात दंत विभागाची ओपीडी चालवली जाते. मात्र, या ओपीडीत रुग्णसंख्या कमी असते. इतर विभागांच्या तुलनेत या विभागाकडे शहरी व ग्रामीण भागातील दंत रुग्ण वळत नसल्याचे दिसून येते.
- माणसाचे खाण्यावर नियंत्रण नसल्याने अनेकांना दातांचे आजार वाढत आहे. पान, खर्रा, तंबाखू, सिगारेटच्या व्यसनाने दात खराब हाेतात. असे असले तरी शासकीय ओपीडीत रुग्ण कमी दिसतात. याची अनेक कारणे आहेत.