जि.प.मार्फत निधी उपलब्ध करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST2020-03-02T06:00:00+5:302020-03-02T06:00:35+5:30
तालुक्याच्या पळसगाव येथील महादेवगड या निसर्गरम्य पर्यटनस्थळाला विकसीत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण निधी उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिली. महाशिवरात्रीनिमित्त महादेवगड देवस्थानात २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान श्रीमत भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.

जि.प.मार्फत निधी उपलब्ध करू
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्याच्या पळसगाव येथील महादेवगड या निसर्गरम्य पर्यटनस्थळाला विकसीत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण निधी उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिली.
महाशिवरात्रीनिमित्त महादेवगड देवस्थानात २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान श्रीमत भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाच्या समारोपाप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संस्था अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे, नाना कांबळी, पं.स.सभापती सरीता अलोने, माजी पं.स.सभापती परसराम टिकले, जि.प.सदस्य मनिषा दोनाडकर, पं.स.सदस्य गोपाल ऊईके, अशोक नंदेश्वर, पोलीस निरीक्षक प्रदिप लांडे, सरपंच ताराबाई धनबाते, दिपाली मडावी, कैलास पारधी, मारोती बगमारे, महादेवगड देवस्थानचे अध्यक्ष पुंडलिक घोडाम, उपाध्यक्ष श्रीराम ठाकरे, मुखरु पत्रे, प्रशांत पिजरकर, मनोहर चव्हारे, मारोती दोनाडकर आदी हजर होते.
महादेवगड डोंगरीला पर्यटनस्थळाचा ड दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करू, असे कंकडालवार यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन रेवनाथ चव्हारे, प्रस्ताविक दुवास नाई यांनी केले तर आभार दिलीप घोडाम यांनी मानले. गोपालकाल्याने भागवत सप्ताहाचा समारोप करण्यात आला. यावेळी भाविक उपस्थित होते.