आम्हीच आहोत ‘सरकार’, कशाला हवा आधार अन् अपार! आदिवासींना भ्रमित करण्याचा प्रयत्न

By संजय तिपाले | Updated: January 8, 2025 13:07 IST2025-01-08T13:06:11+5:302025-01-08T13:07:37+5:30

‘एसी भारत सरकार’चा गडचिरोलीत शिरकाव

We are the 'government', why do we need support and immense support! Attempt to mislead the tribals | आम्हीच आहोत ‘सरकार’, कशाला हवा आधार अन् अपार! आदिवासींना भ्रमित करण्याचा प्रयत्न

आम्हीच आहोत ‘सरकार’, कशाला हवा आधार अन् अपार! आदिवासींना भ्रमित करण्याचा प्रयत्न

स्पेशल  रिपाेर्ट - संजय तिपाले, लोकमत न्यूज नेटवर्क, गडचिरोली : ‘हम यहाँ के मूलनिवासी है, हम मानते नही कोई सरकार, हम खुद ही है सरकार... तो क्यों चाहिए आधार और अपार ?’ संविधान, व्यवस्थेला आव्हान देणारा हा प्रश्न ‘एसी भारत सरकार’शी संबंधित कार्यकर्त्याचा आहे. ‘समांतर सरकार’चा दावा करणाऱ्या या संघटनेशी संबंधित कार्यकर्त्यांनी सुरजागडच्या (ता. एटापल्ली) यात्रेत ६ जानेवारीला हजेरी लावली. निरक्षर आदिवासींना संभ्रमित करू पाहणाऱ्या या कार्यकर्त्यांचा ‘लोकमत’ने भांडाफोड केला.

गुजरातमध्ये उदय झालेल्या या संघटनेचे मध्यप्रदेश, राजस्थानमध्येही समर्थक आहेत. स्वतःच्या नावापुढे ते एसी शब्द लावतात. नंदुरबार, नाशिक पाठोपाठ गडचिरोलीतही या संघटनेने आपले पाय पसरविले आहेत. या संघटनेचे कार्यकर्ते लोकांना भ्रमित करून सरकारविरुद्ध भडकवण्याचे काम करतात. संघटनेशी संबंधित कार्यकर्त्यांवर २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान एटापल्ली तालुक्यातील आलदंडी व पिपली बुर्गी पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद झालेले आहेत. मतदानाला विरोध करून प्रशासनाविरुद्ध लोकांना भडकावल्याचा आरोप  कार्यकर्त्यांवर होता, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

‘अपार आयडी’बाबत संभ्रम, ‘एसी सरकार’वर संशय

डिसेंबर महिन्यात एटापल्ली तालुक्यात ‘अपार आयडी’ला (डिजिटल ओळखपत्र) कडाडून विरोध झाला होता. पालक विद्यार्थ्यांना घेऊन घरी गेले होते, त्यामुळे आश्रमशाळा ओस पडल्या होत्या. यात्रेत कथित संघटनेशी संबंधित काहींनी आधारकार्डसह अपार आयडीला विरोध दर्शवला. त्यामुळे एटापल्लीतील अपार आयडीबाबत पालकांना संभ्रमित करण्यामागे ही संघटना असल्याचा संशय आहे.

नाव विचारले तर म्हणे ‘हम खुद है..

  • सुरजागड (ता. एटापल्ली) येथील ठाकूरदेव यात्रोत्सवात ‘लोकमत’ने या कार्यकर्त्यांना बोलते केले. यापैकी एकाला नाव विचारले तर ‘हम खुद है.. ’असे म्हणत स्वत:च्या छातीवर बोट ठेवले. 
  • गावाबद्दल विचारले असता यहीं जमीनपर रहते है.. असे उत्तर त्याने दिले. दुसऱ्याने ‘हम यहाँ के सरकार है.. ’असे सांगून हमे कोई सरकारी योजना नही चाहिए.. असे सांगितले. 
  • आधार नको म्हणता, मग तुमच्याकडे मोबाइल कसा, असे विचारले असता तो गोंधळला.

Web Title: We are the 'government', why do we need support and immense support! Attempt to mislead the tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.