शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

आलापल्ली शहराचा पाणीपुरवठा बंदच राहणार

By admin | Updated: March 6, 2016 01:04 IST

आलापल्ली ग्रामपंचायतीकडे सुमारे २६ लाख ५८ हजार ९०२ रूपयांची पाणीपट्टी थकीत आहे. या थकीत पाणीपट्टीमुळे पाणीपुरवठा योजना आर्थिक अडचणीत आली आहे.

२६ लाखांची पाणीपट्टी थकीतअहेरी : आलापल्ली ग्रामपंचायतीकडे सुमारे २६ लाख ५८ हजार ९०२ रूपयांची पाणीपट्टी थकीत आहे. या थकीत पाणीपट्टीमुळे पाणीपुरवठा योजना आर्थिक अडचणीत आली आहे. त्यामुळे पाणी योजना दुरूस्त होऊनही आलापल्ली शहराला पाणीपुरवठा केला जाणार नाही, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता जी. डी. बारापात्रे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. आलापल्लीसह गेर्रा, वांगेपल्ली, क्रिष्णापूर, चिचगुडी, चेरपल्ली, गडअहेरी, गुप्पा या आठ गावांना ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या मार्फतीने पाणीपुरवठा केला जातो. विद्युत रोहित्रावर वीज कोसळल्याने चार दिवसांपासून सदर पाणीपुरवठा योजना बंद पडली होती. त्यामुळे पाण्यासाठी हाहाकार निर्माण झाला होता. परिणामी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने याची दखल घेऊन रोहित्र दुरूस्त केला आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा शनिवारी पूर्ववत झाला. रविवारी सकाळपासून पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा आहे. मात्र हा पाणीपुरवठा आलापल्ली वगळता इतर सात गावांना केला जाणार आहे. आलापल्ली ग्रामपंचायतीकडे मागील अनेक वर्षांपासून पाणीपट्टी कर थकीत आहे. पाणीपट्टीची रक्कम भरण्यात यावी, याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ग्रामपंचायतीला अनेकवेळा पत्र लिहिले आहे. मात्र पाणीपट्टी भरण्याबाबत ग्रामपंचायतीने कोणतीही दखल घेतली नाही. यापूर्वी १४ जानेवारी रोजी नोटीस पाठवून २५ फेब्रुवारी २०१६ पर्यंत या कार्यालयास थकीत पाणीपट्टी भरण्यात यावी, अन्यथा २६ फेबु्रवारीपासून पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही ग्रामपंचायतीने पाणीपट्टी भरली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. अचानक पावसामुळे रोहित्र जळाल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडली होती. सदर योजना शनिवारपासून पूर्ववत सुरू झाली आहे. मात्र आलापल्ली शहराला पाणीपुरवठा केला जाणार नाही. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या तीव्र होणार आहे. याबाबत आलापल्लीच्या उपसरपंच पुष्पा अलोणे यांना विचारणा केली असता, थकलेली पाणीपट्टी दोन वर्षांपूर्वीचे आहे. टप्प्याटप्याने पाणीपट्टीचा भरणा केला जाईल. पाणी ही अत्यावश्यक गरज असल्याने पाणीपुरवठा नियमित सुरू ठेवावा, अशी प्रतिक्रिया लोकमतशी बोलताना दिली. (शहर प्रतिनिधी)