पाणी साठवण बंधारा ठरला वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:24 IST2021-06-21T04:24:03+5:302021-06-21T04:24:03+5:30
शासनाच्या जलसंधारण विभागा अंतर्गत सर्वसाधारण योजना - २०१९ -२०२० यातून ७ लाख रुपयांचा निधी बंधारा बांधकाम करण्यासाठी उपलब्ध झाला. ...

पाणी साठवण बंधारा ठरला वरदान
शासनाच्या जलसंधारण विभागा अंतर्गत सर्वसाधारण योजना - २०१९ -२०२० यातून ७ लाख रुपयांचा निधी बंधारा बांधकाम करण्यासाठी उपलब्ध झाला. त्यानुसार कान्होली हेटी गावाकडे जाणाऱ्या नाल्यावर बंधाऱ्याचे बांधकाम झाले आहे दरवर्षी नाल्यातून पाणी वाहून जात होते त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी लागण्याच्या वेळी नाल्यात पाणी नसायचे त्यामुळे पिके पाण्याविना हातून जात होत. यावर्षी उन्हाळ्यात या बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. सध्या या बंधाऱ्यात पाणी साचले असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
नाल्या शेजारी असलेल्या शेत जमिनीत खरिपात धान पिकांची लागवड केली जाते. पीक हाती येईपर्यंत शेतकऱ्यांना पिकाला पाणी द्यावे लागत असते. दरवर्षी नाला शेजारी असूनही नाल्या शेजारी असलेल्या शेतातील पीक पाण्याविना करपून जायचे आता मात्र शेतकऱ्यांच्या शेताजवळ पाणी साठवण असल्याने शेतकरी आनंददायी दिसून येत आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात शेतजमिनी आहे. काही भागात सिंचन सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना पीक घेणे अवघड काम होते, मात्र बंधाऱ्याचे काम झाल्याने सिंचनाची सुविधा झाली आहे.
===Photopath===
200621\img-20210620-wa0139.jpg
===Caption===
कान्होतील बंधारा ठरला शेतकऱ्यासाठी वरदान फोटो