गडचिराेलीमध्ये पाणीटंचाईचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2022 05:00 IST2022-05-11T05:00:00+5:302022-05-11T05:00:29+5:30
नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नळाद्वारे शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी जवळपास सात जलकुंभ उभारण्यात आले आहेत. दाेन ठिकाणी नवीन जलकुंभ झाले आहेत. वाॅर्डावाॅर्डांत पाईपलाईन टाकून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाताे. वैनगंगा नदीवरील बाेरमाळा घाटावर पालिका प्रशासनाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. नदीच्या विहिरीतून जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाते. तेथून शहरभरातील जलकुंभांमध्ये पाणीपुरवठा केला जाताे. येथून पाईपलाईनद्वारे नळधारकांना सकाळी व सायंकाळच्या सुमारास पाणी दिले जाते.

गडचिराेलीमध्ये पाणीटंचाईचे सावट
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नळ पाणीपुरवठा याेजनेच्या माध्यमातून गडचिराेली शहरातील नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाताे. मात्र एप्रिल महिन्यापासूनच पालिकेची पाणी याेजना प्रभावित झाली आहे. वैनगंगा नदीची पाणीपातळी खालावल्याने आत्तापासूनच गडचिराेली शहरात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.
नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नळाद्वारे शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी जवळपास सात जलकुंभ उभारण्यात आले आहेत. दाेन ठिकाणी नवीन जलकुंभ झाले आहेत. वाॅर्डावाॅर्डांत पाईपलाईन टाकून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाताे. वैनगंगा नदीवरील बाेरमाळा घाटावर पालिका प्रशासनाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. नदीच्या विहिरीतून जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाते. तेथून शहरभरातील जलकुंभांमध्ये पाणीपुरवठा केला जाताे. येथून पाईपलाईनद्वारे नळधारकांना सकाळी व सायंकाळच्या सुमारास पाणी दिले जाते.
दरवर्षी शहरात एप्रिल महिना लागला की, वाढत्या उष्णतामानामुळे पाण्याचे प्रमाण कमी हाेते. दरम्यान केवळ २० ते २५ मिनिटे नळाद्वारे पाणीपुरवठा हाेते. केवळ काही सखल भाग साेडला तर बऱ्याच वाॅर्डांत एप्रिल, मे व जून महिन्यांत अल्प पाणीपुरवठा हाेताे.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान अनेकदा चामाेर्शी मार्गावरील पाईपलाईन फुटून नळ पाणीपुरवठा प्रभावित झाला हाेता. त्या वेळी नळधारकांनी विहीर व बाेअरचा आधार घेतला.
चार दिवस गाेकुलनगरातील पाणीपुरवठा बंद
चामाेर्शी मार्गावरील ४५० एमएस रायझिंग मेन पाईपलाईन शिफ्टिंगचे काम ४ व ५ मे राेजी करण्यात आले. त्या वेळी शहरातील पाणीपुरवठा दाेन दिवस बंद राहणार असल्याचे न. प. प्रशासनाने जाहीर केले हाेते. मात्र गाेकुलनगर व माता मंदिर परिसरातील नळ पाणीपुरवठा तब्बल चार ते पाच दिवस बंद हाेता. माता मंदिर परिसरात १० मे राेजी मंगळवारला सायंकाळच्या सुमारास नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. परिणामी या भागातील नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागला.
एकच वेळ हाेताे पाणीपुरवठा
- उन्हाळ्यामध्ये पाण्याची अधिकाधिक गरज भासते. त्याचा वापरही वाढत असताे. मात्र पाणीटंचाईमुळे पुरेसे पाणी मिळत नाही. आता गेल्या आठ दिवसांपासून गाेकुलनगर, माता मंदिर परिसर व शहरातील बऱ्याच वाॅर्डांत केवळ २० ते २५ मिनिटे दिवसातून एकदाच नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काही दिवसांत गडचिराेली शहरात पाणी संकट पुन्हा तीव्र हाेणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा.