शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
4
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
5
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
6
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
7
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
8
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
9
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
10
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
11
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
12
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
13
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
14
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

पाच तालुक्यांची भूजल पातळी खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 23:24 IST

आॅगस्ट महिन्यातच पावसाने उसंत घेतल्याने पाच तालुक्यांमधील पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या अगदी वेळेवर आगमन झाले.

ठळक मुद्देकमी पावसाचा परिणाम : भूजल सर्वेक्षण विभागाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आॅगस्ट महिन्यातच पावसाने उसंत घेतल्याने पाच तालुक्यांमधील पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या अगदी वेळेवर आगमन झाले. सुरूवातीचे काही दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने शेतीची कामे अगदी वेळेवर उरकली होती. असाच पाऊस सुरू राहिल्यास यावर्षी सरासरी गाठेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आॅगस्ट महिन्याच्या शेवटी पावसाने कायमची उसंत घेतली. तेव्हापासून अजूनपर्यंत पाऊस पडला नाही. पाऊस कमी झाल्याने याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील देसाईगंज, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा या तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाला. त्यामुळे या तालुक्यांची पाणी पातळी घटली आहे.पाणी पातळीचे निरिक्षण करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात एकूण ११२ निरिक्षण विहिरी आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी या विहिरींच्या पाण्याची पातळी मोजतात. त्यावरून भूजल पातळीचा अंदाज वर्तविला जातो. विशेष म्हणजे, जलयुक्त शिवार अभियानमुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होईल, असा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असला तरी हा दावा प्रत्यक्षात उतरला नसल्याचे दिसून येत आहे.गडचिरोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांची भूजल पातळी सरासरीच्या तुलनेत घटली असली तरी पाण्याचा उपसा कमी असल्याने एप्रिल महिन्यापर्यंत पाणी टंचाई निर्माण होत नाही, असा सर्वसाधारण दरवर्षीचा अनुभव आहे. मात्र दिवसेंदिवस बोअरवेल, विहिरी यांची संख्या वाढत चालली असल्याने भूजलाचा उपसाही वाढला आहे. परिणामी भूजल पातळीत घट होत आहे. भविष्यात पाण्याची चिंता निर्माण होणार आहे.सात तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊसयावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या १.८८ टक्के पाऊस कमी झाला आहे. विशेष म्हणजे, यावर्षी अत्यंत विषम प्रमाणात पाऊस झाला. दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. भामरागड, एटापल्ली, सिरोंचा या तालुक्यांना पावसाने झोडपून काढले होते. तर दुसरीकडे गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. गडचिरोली तालुक्यात सरासरीपेक्षा १५ टक्के, आरमोरी तालुक्यात सरासरीपेक्षा १८ टक्के, देसाईगंज ११ टक्के, कुरखेडा २२ टक्के, कोरची २३ टक्के, धानोरा १६ टक्के, चामोर्शी १५ टक्के कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. तर मुलचेरा तालुक्यात ९ टक्के, अहेरी २७ टक्के, एटापल्ली ५ टक्के, भामरागड २७ टक्के व सिरोंचा तालुक्यात सुमारे ४२ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई