Water flows through the streets in Vairagada | वैरागडात रस्त्यावरून वाहते पाणी
वैरागडात रस्त्यावरून वाहते पाणी

ठळक मुद्देवाहनधारक कमालीचे त्रस्त : ग्रामपंचायतीने मार्ग दुरूस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : येथील मच्छीपालन सहकारी संस्थेपासून कढोली, मानापूरकडे जाणाऱ्या बायपास मार्गावर स्थानिक प्रशासनाने अनेकदा नाली बांधून लाखो रुपयांचा खर्च केला आहे. मात्र अजूनही या रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्याने बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत तसेच ये-जा करणाऱ्यांची अडचण होत आहे.
वैरागड येथील स्थानिक प्रशासनाचा कारभार म्हणजे कुणाच्या पायात नाही, असा सुरू आहे. काम करण्यापूर्वी नियोजन राहत नसल्याने आवश्यक नसलेल्या ठिकाणी रस्ते, नाल्या मंजूर केल्या जातात. मात्र आवश्यक असलेल्या ठिकाणी काम होत नाही. कमिशन लाटण्यासाठी रस्त्याचे तुकडे पाडून कामे केली जातात. मानापूरकडे जाणारा रस्ता अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावर पेट्रोलपंप आहे तसेच ग्रामपंचायत चौकात येण्यासाठी याच रस्त्याचा वापर होतो. मात्र या रस्त्यावर मागील चार महिन्यापासून सातत्याने सांडपाणी वाहत आहे. पायी जाणाºया व वाहनधारकांचीही अडचण होत आहे. सतत पाणी वाहल्याने सदर मार्ग खराब होण्याची शक्यता आहे. योग्य ते बांधकाम करून रस्त्यावरून सांडपाणी वाहणार नाही, याची खबरदारी ग्रामपंचायतीने घ्यावी, याबाबत नागरिकांकडून मागणी होत असताना ग्रामपंचायत मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. सांडपाण्यामुळे रस्त्यावर चिखल निर्माण झाले आहे.
उपसरपंच श्रीराम अहिरकर यांना विचारणा केली असता, या रस्त्यासाठी जिल्हा वार्षिक निधीतून निधी मिळावा, यासाठी प्रस्ताव पाठविला आहे, अशी माहिती दिली.

Web Title: Water flows through the streets in Vairagada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.