मेंढा घाटातून होते दिवसाढवळ्या रेती चोरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 06:00 AM2020-02-16T06:00:00+5:302020-02-16T06:00:15+5:30

गडचिरोली शहरात मोठय़ा प्रमाणात बांधकाम सुरू आहेत. मात्र रेती घाटांचे लिलाव झाले नसल्यामुळे रेतीचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा गैरफायदा रेती तस्करांनी घेण्यास सुरूवात केली आहे. गडचिरोली शहरापासून चार किमी अंतरावर कठाणी नदी आहे. या नदीच्या मेंढा (बोदली) घाटातून बोदलीमार्गे गडचिरोली शहरात रेती आणली जात आहे.

Was the sheep from the wharf stealing daytime sand? | मेंढा घाटातून होते दिवसाढवळ्या रेती चोरी?

मेंढा घाटातून होते दिवसाढवळ्या रेती चोरी?

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । जेप्रा व बोदलीवासीयांची महसूल व पोलीस विभागाकडे तक्रार
कमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोलीपासून अगदी चार किमी अंतरावर असलेल्या बोदलीजवळील मेंढा घाटातून दिवसाढवळ्या ट्रॅक्टरने दरदिवशी शेकडो ब्रॉस रेती चोरून गडचिरोली शहरात विकली जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या गावातील महसूल विभागाच्या कर्मचा:यांचे याकडे पूर्णपणो दुर्लक्ष असून विभागाच्या कार्यशैलीबाबत नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.गडचिरोली शहरात मोठय़ा प्रमाणात बांधकाम सुरू आहेत. मात्र रेती घाटांचे लिलाव झाले नसल्यामुळे रेतीचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा गैरफायदा रेती तस्करांनी घेण्यास सुरूवात केली आहे. गडचिरोली शहरापासून चार किमी अंतरावर कठाणी नदी आहे. या नदीच्या मेंढा (बोदली) घाटातून बोदलीमार्गे गडचिरोली शहरात रेती आणली जात आहे. विशेष म्हणजे, बोदली ते गडचिरोली हा राज्य महामार्ग आहे. या मार्गावरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ राहते. असे असतानाही सदर वाहने पोलीस किंवा महसूल विभागाच्या नजरेस आलेली नाही. काही ट्रॅक्टरमधील रेती इंदिरा नगरात जात आहे. कारवाई होत नसल्याने रेती तस्करांची हिंमत वाढत चालली आहे. सदर रेती गडचिरोली शहरात तीन ते चार हजार रुपये प्रती ट्रॅक्टर दराने विकून एका रात्रीतून रेती तस्कर 3क् ते 4क् हजार रुपये कमवित आहेत. मेंढा (बोदली) घाटातून खुलेआम रेतीची चोरी होत असल्याची तक्रार जेप्रा व बोदली येथील काही नागरिकांनी जिल्हाधिकारी व गडचिरोली पोलिसांकडे केली आहे. आता ते काय कारवाई करतात याकडे गावक:यांचे लक्ष लागले आहे. चोरीचा व्हिडीओ व्हायरलमेंढा (बोदली) रेती घाटातून दिवसाढवळ्या रेतीची चोरी केली जात आहे. याचा व्हिडीओ काही जागरूक नागरिकांनी मोबाईलने काढून तो व्हायरल केला आहे. या व्हिडिओमध्ये जवळपास चार ते पाच ट्रॅक्टर नदी पात्रतून रेतीची चोरी करीत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ मेंढा (बोदली) घाटाचा असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडीओमध्ये दिसणा:या ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी आहे. बोदलीवासीय त्रस्तनदी पात्रतून रेती भरल्यानंतर सदर ट्रॅक्टर प्रचंड वेगाने चालवितात. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, रात्री रेतीची चोरीचे प्रमाण वाढत असल्याने ट्रॅक्टरच्या आवाजाने बोदलीवासीयांची झोपमोड होत आहे. यामुळे ते कमालीचे त्रस्त झाले आहेत. या रेती तस्करांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ते करत आहेत.

Web Title: Was the sheep from the wharf stealing daytime sand?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू